logo

पेन्शनरला बोलण्यात गुंतवले एटीएम कार्ड बदलून २५ हजार लांबविले....



स्टेट बँकेच्या एटीएममध्ये घडला प्रकार; गुन्हा दाखल

जळगाव : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेच्या एटीएममध्ये अनोळखी व्यक्तीने पेन्शनधारकाला बोलण्यात गुंतवून त्यांचे एटीएम कार्ड बदलले आणि त्यांच्या बँक खात्यातून २५ हजार ७०० रुपये काढून फसवणूक केल्याची घटना शनिवार, २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी रमेश हरचंद मोरे (वय ६६,

पैसे रा. चंदूअण्णा नगर, जळगाव) है शनिवार, २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास जळगाव शहरातील स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेतील एटीएममध्ये काढण्यासाठी गेले असताना, तेथे असलेल्या अनोळखी व्यक्तीने त्यांना बोलण्यात गुंतवले. या संधीचा फायदा घेऊन आरोपीने फिर्यादीचे एटीएम कार्ड बदलले. कार्ड बदलल्यानंतर आरोपीने त्यांच्या बँक खात्यातून तीन वेळा एटीएमद्वारे एकूण २५ हजार ७०० रुपये काढले आणि त्यांची फसवणूक केली. रमेश मोरे यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी तातडीने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

5
534 views