logo

बॉलीवूड सुपरस्टारच्या रोड शो मध्ये शिवसेनेच्या डॉ. अश्विनी भोंडेकर ने केली मतदारांच्या मनात जागा शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड जनसमर्थन

प्रेस नोट
भंडारा

बॉलीवूड सुपरस्टारच्या रोड शो मध्ये शिवसेनेच्या डॉ. अश्विनी भोंडेकर ने केली मतदारांच्या मनात जागा
शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड जनसमर्थन
विलास केजरकर भंडारा.

भंडारा: - भंडारा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. अश्विनीताई नरेंद्र भोंडेकर आणि शिवसेनेचे सर्व ३४ नगर सेवक उमेदवार यांच्या समर्थनार्थ रविवार ला भव्य रोड शोने शहरात प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. या रोड शोचे मुख्य आकर्षण म्हणजे बॉलीवूड सुपरस्टार गोविंदा, अभिनेत्री जरीन खान आणि अभिनेता तुषार कपूर होते. या कलाकारांना पाहण्यासाठी भंडाऱ्यातील रस्ते अक्षरशः खचाखच भरून गेले होते.
रोड शो भंडारा ( नवीन टाकळी) येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) पासून सुरू झाला. शहरातील प्रमुख मार्गांवरुन निघाला आणि प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. रोड शोच्या दरम्यान विविध प्रमुख चौकांमध्ये आयोजित सभांमध्ये आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी नागरिकांना संबोधित करतांना सांगितले की, काही शक्ती भंडाऱ्यात फूट पाडण्याचा, प्रगती थांबवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण आपण एकत्र आलो तर कोणतीही ताकद भंडाऱ्याला मागे ढकलू शकत नाही. विकासाला विरोध करणे म्हणजे भंडाऱ्याच्या भविष्याशी खेळणे आहे. असे मत आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केले.
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. अश्विनीताई भोंडेकर यांनीही रोड शो दरम्यान नागरिकांना संबोधित करतांना भंडाऱ्यासाठी आपला व्हीजन डाक्युमेंटची माहिती दिली की, २०२९ पर्यंत भंडारा हे महाराष्ट्रातील विकसित शहरांमध्ये अग्रस्थानी असेल. दुसरी बारामती म्हणून भंडाऱ्याची ओळख निर्माण करू. सर्व प्रभागांचा समान विकास, पर्यटनवाढ, शैक्षणिक सुविधा, महिला सुरक्षेची हमी आदि विषय शहर विकासाच्या मुख्य एजेंडा असतील.
रोड शोमध्ये सहभागी झालेल्या तिन्ही कलाकारांनीही प्रसिद्ध डायलॉग्स म्हणत नागरिकांमध्ये ऊर्जेची लाट निर्माण केली. त्यांनी आमदार नरेंद्र भोंडेकर यांची दूरदृष्टी सुरू असलेले आणि होऊ घातलेले प्रकल्प यांचे कौतुक केले. विशेषतः वैनगंगा जलपर्यटन प्रकल्पाबद्दल सांगितले की, वैनगंगा नदी ही भंडाऱ्याचे वरदान आहे. पर्यटन प्रकल्प पूर्ण झाला की भंडाऱ्याकडे देश-विदेशातून हजारो पर्यटक येतील. रोजगार वाढेल, अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि भंडारा पर्यटन नकाशावर झळकेल.
या रोड शोमध्ये सर्व ३४ नगर सेवक उमेदवार, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने सहभागी होते. मार्गावर सर्वत्र नागरिकांनी भव्य स्वागत केले होते. व पुष्पवृष्टी केली तर अनेक ठिकाणी महिलांनी आरत्या उतरवून उमेदवारांचे स्वागत केले.
त्यावेळी शिवसेनेचे सर्वच उमेदवार उपस्थित होते. व सर्वच उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले.

RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views