
पुणे
Daund News : दौंड नगरपालिका
एका जागेची निवडणूक प्रक्रिया स्थगित
दौंड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ मधील एका जागेची निवडणूक स्थगित करण्यात आली
पुणे
Daund News : दौंड नगरपालिका
एका जागेची निवडणूक प्रक्रिया स्थगित
दौंड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ मधील एका जागेची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे.
दौंड - दौंड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ मधील एका जागेची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. एका जागेची निवडणूक प्रक्रिया स्थगित झाल्याने नगराध्यक्षपदाकरिता सहा तर २५ जागांसाठी ८३ उमेदवार रिंगणात आहेत.
दौंड नगरपालिकेचा प्रभाग क्रमांक ९ - अ ही जागा अनुसूचित जाती (महिला) साठी राखीव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार शुभांगी घुले यांनी प्रतिस्पर्धी नागरिक हित संरक्षण मंडळाच्या उमेदवार रेणूका थोरात यांच्या जातीच्या दाखल्यासंबंधी हरकत घेतली होती. छानणीत अर्ज वैध ठरल्याने त्याविरूध्द शुभांगी घुले यांनी न्यायालयात दाद मागितली होती. प्रभाग क्रमांक ९ अ मधून शुभांगी घुले ( राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), रेणूक थोरात (नागरिक हित संरक्षण मंडळ) व शीतल मोरे (राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्ष) या तीन उमेदवार रिंगणात होत्या. या एका जागेसाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
दौंड नगरपालिका निवडणुकीत जनतेतून थेट निवडून द्यावयाच्या नगराध्यक्षपदाकरिता सहा तर सव्वीस सदस्यपदांकरिता एकूण ८६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. एका जागेची निवडणूक प्रक्रिया स्थगित झाल्याने नगराध्यक्षपदाकरिता सहा तर २५ जागांसाठी ८३ उमेदवार रिंगणात आहेत.
न्यायालयात दाद मागितल्याने प्रभाग क्रमांक ९ - अ ची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार ४ डिसेंबर रोजी या एका जागेची निवडणूक अधिसूचना प्रकाशित होईल. १० डिसेंबर पर्यंत या जागेसाठी दाखल उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. ११ डिसेंबर रोजी निवडणूक चिन्ह देऊन निवडणूक लढविणार्या उमेदवारांची यादी प्रकाशित केली जाईल. तर २० डिसेंबर रोजी एका जागेसाठी मतदान होऊन २१ डिसेंहर रोजी मतमोजणी होईल.
प्रभाग क्रमांक ९ - अ या एका जागेसाठी न्यायालयात अपील दाखल झाल्याने त्या जागेची निवडणूक स्थगित झाली आहे. पुढील निर्देशानुसार या जागेसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल.
- नीलप्रसाद चव्हाण, निवडणूक निर्णय अधिकारी