पुणे येथील अपघातग्रस्त प्रदीप शिंदे यांना ₹1 लाखाची आर्थिक मदत....
पुणे प्रतिनिधी–राकेश बेहेरे पाटील
खराडी येथील प्रदीप बाळासाहेब शिंदे यांच्या अपघातानंतर सुरू असलेल्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून ₹1,00,000 ची मदत मंजूर करण्यात आली आहे.
या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, मावळचे खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे, शिवसेना वैद्यकीय कक्षाचे श्री मंगेश चिवटे, राज्यप्रमुख रामहरी राऊत, तसेच युवा सेना पदाधिकारी विश्वजित बारणे, सागर पाचर्णे आणि कौस्तुभ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करण्यात आले.
पत्रकार उमेश पाटील यांच्या माध्यमातून खासदार बारणे यांचे स्वीय सहाय्यक सागर पाचर्णे आणि आरोग्यमंत्र्यांचे स्वीय सहायक कौस्तुभ थोरात यांनी तत्परतेने पाठपुरावा करून रुग्णालय खर्चात सवलत मिळवून दिली.
या मदतीमुळे शिंदे कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला असून, समाजातील सहकार्य आणि माणुसकीचे उत्कृष्ट उदाहरण या माध्यमातून समोर आले आहे.