logo

दबुलडाणा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत जनता मराठी प्राथमिक विद्यामंदिर, पिंपळगाव सराईचे सुयश


दि. २६ नोव्हेंबर २०२५ बुलढाणा, महाराष्ट्र .

शिक्षण विभाग पंचायत समिती बुलडाणा आणि तालुका विज्ञान शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बुलडाणा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी इ.स. २०२५-२६ ही दिनांक २५ व २६ नोव्हेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय सैनिक स्कूल, राजीव गांधी मिलिटरी स्कूल, अजिंठा रोड, कोलवड,
बुलडाणा येथे उत्साहात संपन्न झाली. बुलडाणा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांनी या प्रदर्शनीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या विज्ञान महोत्सवात विद्यार्थ्यांसाठी विज्ञान उपकरण निर्मिती, निबंध स्पर्धा, स्वयंप्रेरित भाषण स्पर्धा व प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धांमध्ये जनता मराठी प्राथमिक विद्यामंदिर, पिंपळगाव सराई येथील विद्यार्थी प्रसाद संतोष फसले, कु. आराध्या अंकुश तरमळे आणि कु. प्रांजल विजय पाटोळे यांनी विज्ञान उपकरण निर्मिती विभागात उल्लेखनीय सहभाग नोंदविला. तिन्ही विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

याच प्रदर्शनीमध्ये तालुक्यातील सर्व शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जनता मराठी प्राथमिक विद्यामंदिरातील शिक्षक विवेक मोहन गवते यांनी संख्याज्ञान या विषयावर प्रभावी अध्यापनासाठी सादर केलेल्या साहित्याला तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक मिळाला, ही पिंपळगाव सराई शाळेसाठी अभिमानाची बाब ठरली.

या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीचे अध्यक्ष रामकृष्णदादा गोविंदराव शेटे, सचिव प्रेमराज प्रभूलालजी भाला, संचालक मंडळ, स्थानिक सल्लागार समिती सदस्य, जनता प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मला देवराव खुर्दे, जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोदजी ठोंबरे, तसेच जनता परिवारातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

0
25 views