logo

*गडचिरोलीत संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेबांना विनम्र अभिवादन..मा.खा.डॉ. अशोकजी नेते*

प्रेस नोट
गडचिरोली

*गडचिरोलीत संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेबांना विनम्र अभिवादन..मा.खा.डॉ. अशोकजी नेते*
---------------------------------------
*गडचिरोली नगरपरिषद निवडणूक ही भवितव्य घडविणारी; विकासाच्या दिशेने गडचिरोली अग्रस्थानी राहील” — मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांचे प्रचारार्थ प्रतिपादन...*
----------------------------------------
--- *आणि प्रभाग ३, ४ व ५ मधील भाजपा प्रचार कार्यालयांचे भव्य उद्घाटन**
----------------------------------------
दि. २६ नोव्हेंबर २०२५ | गडचिरोली

गडचिरोली नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर आज स्वामी विवेकानंद नगरातील संविधान चौक परिसरात प्रभाग ५ आणि प्रभाग ३, ४ मधील विविध ठिकाणी भाजपा उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांचे भव्य उद्घाटन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

*संविधान दिनानिमित्त महामानवाला अभिवादन*

संविधान दिनानिमित्त माजी खासदार डॉ.अशोकजी नेते यांनी गडचिरोलीत संविधान चौक परिसरात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करत महामानवाला अभिवादन केले. यासोबतच संविधान चौक येथे प्रभाग क्रमांक ५ मधून अधिकृत उमेदवारी असलेले प्रकाश वसंत निकुरे आणि सौ. सिमा राहुल कन्नमवार (कोसे), तसेच नगराध्यक्षा पदाच्या अधिकृत उमेदवार अँड. प्रणोती सागर निंबोरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून “संविधान दिनाच्या” मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थितांना निवडणुकीत भाजपाला मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून देण्याचे आवाहन करण्यात आले.

*गडचिरोली BJP प्रचाराला जोशपूर्ण सुरुवात!*
प्रभाग ३, ४ व ५ मधील प्रचार कार्यालयांचे उद्घाटन; उत्स्फूर्त प्रतिसाद...
प्रभाग ३ इंदिरा नगर, प्रभाग ४ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक रामनगर, आणि प्रभाग ५ स्वामी विवेकानंद नगर येथील संविधान चौक या ठिकाणी आयोजित प्रचार कार्यालय उद्घाटन सोहळ्यात मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते सहभागी झाले.
“एकदिलाने काम करा, विजय आपलाच होणार” असा उत्साहवर्धक संदेश या कार्यक्रमात देण्यात आला.
*प्रभाग निहाय भाजपाचे अधिकृत उमेदवार –*
*प्रभाग क्र. ३*

सौ. योगिता प्रमोद पिपरे
अनिल पांडुरंग कुनघाडकर
*प्रभाग क्र. ४*
संजय सुरेशराव मांडवगडे
वर्षा सुखदेव शेडमाके
*प्रभाग क्र. ५*
प्रकाश वसंत निकुरे
सिमा राहुल कन्नमवार (कोसे)

नगराध्यक्ष पदासाठी अँड. प्रणोती सागर निंबोरकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी सर्व वक्त्यांनी केले.
*मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांचे प्रचार कार्यालय उदघाटन प्रचारार्थ प्रभावी प्रतिपादन*
माजी खासदार तथा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी आपल्या खास शैलीत जनतेशी संवाद साधत विकासकार्यातील संबंधित बोलताना ते म्हणाले—
“लक्ष्मी ही तुटलेल्या पंजावर बसत नाही…लक्ष्मी ही घड्याळीवरही बसत नाही…
लक्ष्मी ही कमळावरच बसते!
म्हणून नगरपरिषदेत कमळ फुलवा.” ते पुढे म्हणाले—
“गोकुळनगर, रामनगर, विवेकानंद नगर, इंदिरानगर या नव्या वस्त्यांची उभारणी ही एका दिवसाची गोष्ट नाही. गडचिरोलीतील ह्या नव्या वस्त्या बसवताना आमचा महत्त्वाचा वाटा होता. त्या काळी फॉरेस्ट अधिकारी नागरिकांना खूप त्रास देत; तेव्हा ‘नागरिकांना त्रास देऊ नका’ असे मी स्पष्ट बजावले.

मी आमदार असताना या वस्त्यांमध्ये पाण्याची व्यवस्था करण्यासाठी माझ्या फंडातून बोरवेल, रस्ते, नंतर लाईट, असे टप्प्याटप्प्याने काम करत विकास केला यांनतर विकासाने हळुहळु बांधकाम सुरू ठेवले. आज या वस्त्या उभ्या आहेत ते सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच.” हे विसरता कामा नये.

ते उपस्थित जनतेला आवाहन करत म्हणाले— केंद्रात व राज्यात आमचे सरकार आहे.त्यामुळे “सर्वांगीण विकास हवा असेल तर नगराध्यक्षा म्हणून अँड. प्रणोती सागर निंबोरकर, तसेच सर्व भाजपा उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करणे गरजेचे आहे. येत्या २ तारखेला कमळाची बटन दाबून प्रचंड मतांनी विजय मिळवून द्या.”असे प्रतिपादन मा.खा.डाँ.अशोकजी नेते यांनी प्रचार कार्यालयाच्या उदघाटन प्रचारार्थ केले.

या उद्घाटन सोहळ्यास जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष व निवडणूक प्रमुख प्रशांत वाघरे, नगराध्यक्षा उमेदवार अँड. प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर), माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, समन्वयक प्रमोद पिपरे, कि.मो.प्र. सचिव रमेश भुरसे, डॉ. चंदाताई कोडवते, कि.मो. जिल्हाध्यक्ष विलास भाडेकर, नरेश हजारे, बंडू झाडे, सुरेश मांडवगडे, कान्हुजी लोहबरे, जनार्दन साखरे आदी प्रमुख पदाधिकारी व सर्व भाजपा उमेदवार तसेच कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.

RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views