logo

विकास कुटे निर्मित"कलवरी" चित्रपटाच्या प्रमोशन जोरात सुरू..

28 नोव्हेंबर रोजी संपुर्ण महाराष्ट्रात रिलीज होत असलेल्या कलवरी चित्रपटाचे प्रमोशन नुकतेच सुरू झाले असुन थोड्याच कालावधीत चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यात कलवरी चित्रपट टिम ला यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. फेसबुक ,इन्स्टाग्राम युट्यूबवर अक्षरशः प्रमोशन चा धुमाकुळ घालत असल्याचे दिसुन येत आहे. कलवरी चित्रपट टिम अगदी शहरापासून गावातल्या शेवटच्या प्रेक्षकांपर्यंत पोहचत असल्याचे दिसून येत आहे.
प्रमोशन अगदी गावातल्या प्रेक्षकांपर्यंत जाऊन करत असलयाने प्रतिसाद ही जोरदार मिळत आहे.ट्रेलर मधुन चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आणि चित्रपट बनवण्याचा उद्देश सफल होईल हे निश्चित आहे.चित्रपटात नव्या आणि अनुभवी कलाकारांची मस्त सांगड घातल्याचे दिसते. डायरेक्टर प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे तयारीचे दिग्दर्शक असून विकास कुटे निर्मित कलवरी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार आहे.
कलाकार राजेश्वरी खरात, राहूल दराडे, अश्विनी इरोळे, सुजित चौरे, सिध्देश्वर झाडबुके, अंकीता राऊत, दत्ता उबाळे,माणिक काळे असे सत्तर पेक्षा जास्त कलाकार चित्रपटात आहेत. तसेच इतर निर्माते रोहीत बेलदरे राणी टोणगे यांचेही सहकार्य लाभत आहे. 28 नोव्हेंबर ला सर्वांनी चित्रपटगृहात जाऊन "कलवरी" चित्रपट पहावा असे अवाहन निर्माता विकास कुटे यांनी केले आहे.

53
2957 views