logo

आमच्यासाठी मुंबईच! आयआयटी बॉम्बेचं नाव आयआयटी मुंबई करण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिणार: देवेंद्र फडणवीस

भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री जिंतेद्र सिंह यांच्या वक्तव्यानंतर निर्माण झालेल्या वादावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिलं आहे. आमच्यासाठी हे मुंबईच आहे, बॉम्बेचं नाव मुंबई (IIT Mumbai) करण्यामागे भाजपचा मोठा वाटा असल्याचं ते म्हणाले. आयआयटी बॉम्बेचं आयआयटी मुंबई असं नाव करावं अशी विनंती आपण पंतप्रधानांना करणार असल्याचंही ते म्हणाले.
केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आयआयटी मुंबईतील एका कार्यक्रमात नावावरुन वक्तव्य केलं होतं. आयआयटी बॉम्बेचं नाव मुंबई केलं नाही यामुळे मला बरं वाटलं असं ते म्हणाले होते. त्यानंतर मनसेने त्यावर आक्रमक भूमिका घेत त्यांना उत्तर दिलं होतं. आता मुख्यमंत्र्यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis On IIT Mumbai : आमच्यासाठी मुंबईच
राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "बॉम्बेचे नाव मुंबई करण्यामागे सर्वात मोठा वाटा हा भारतीय जनता पक्षाचे नेते रामभाऊ नाईकांचा आहे. आमच्याकरता बॉम्बे नाही तर ते मुंबईच आहे. बॉम्बेच्या खुणा या मिटल्या पाहिजेत आणि सगळीकडे मुंबईच असलं पाहिजे. आयआयटी बॉम्बेचं नाव आयआयटी मुंबई असं करण्याची विनंती करणारे पत्र मी स्वतः देशाचे पंतप्रधान आणि मानव संसाधन मंत्र्यांना लिहिणार आहे."

काही लोक सोईस्करपणे, आपल्या मुलांना ज्या शाळेत शिकवतात त्या शाळेचं नाव बदलावं अशी विनंती करत नाहीत असा टोला देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरे यांना लगावला.
IT Mumbai Vs IIT Bombay : नेमका वाद काय?
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी मुंबईऐवजी बॉम्बे नावाच्या वापराचं केलेल्या समर्थनानं मोठी खळबळ उडाली. 'आयआयटीच्या नावातील बॉम्बे तसंच ठेवण्यात आलं, त्याचं मुंबई करण्यात आलं नाही, हे चांगलंच झालं,' असं धक्कादायक वक्तव्य त्यांनी सोमवारी केलं होतं. आयआयटी मद्रासबद्दलही माझ्या याच भावना आहेत असंही वक्तव्य डॉ. जितेंद्र सिंह यांनी केलं. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला

3
67 views