logo

भाजपच्या नगरपरिषद उमेदवार अन् कार्यकर्त्यांकडून पोलीस शिपायाला बेदम मारहाण; नागपूर जिल्ह्यातील डिगडोहदेवी परिसरात खळबळ

नागपूर जिल्ह्यातील डिगडोह देवी परिसरात अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हिंगणा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस शिपाई वृषभ भातुलकर यांना भाजप नगरपरिषद उमेदवार अनिल शर्मा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सामूहिक मारहाण, जीवघेणी धमकी , प्रयत्न व शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप केल्याचे देखील समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हि घटना 24 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री घडली. पोलिस शिपाई भातुलकर ड्युटीवरून घरी परतल्यानंतर सोसायटीत भाजप (BJP) कार्यकर्त्यांच्या घरी DJ मोठ्या आवाजात सुरू असल्याचे दिसले. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी साउंड बंद करण्यासाठी सोसायटी सचिव अभयकुमार दास यांनी दडपशाही केली होती. या भेदभावाबद्दल त्यांनी सचिवाला विचारणा केली, एवढ्यावरून त्यांना खाली बोलावून घेण्यात आले.
Crime News : दहा ते बारा भाजप कार्यकर्त्यांकडून एकट्या पोलीस शिपायाला मारहाण
दरम्यान, भातुलकर खाली पोहचताच “यही है ओ!” असे म्हणत भाजपचे अध्यक्ष आणि नगर परिषद उमेदवार अनिल शर्मा यांनी त्यांच्या कॉलरला पकडून थापडा आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. त्याचवेळी अभयकुमार दास, शरद शर्मा, साजन शर्मा, अजय पाठकसह दहा ते बारा भाजप (BJP) कार्यकर्त्यांनीही एकट्या पोलीस शिपायावर तुटून पडल्याचे पुढे आले. दरम्यान या प्रकरणी आता नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या काळात या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

4
122 views