बीड नगर रोडवर हरितक्रांतीची सुरुवात — डिव्हायडरवर झाडलागवड जोरात
बीड शहरातील नगर रोडवर डिव्हायडरवर झाडे लावण्याचे काम जोरात सुरू आहे. शहराचे सौंदर्य वाढवणे, रस्त्यावरील प्रदूषण कमी करणे आणि वाहतुकीत स्वच्छता/व्यवस्था राखणे या हे काम सुरू करण्यात आले आहे.
डिव्हायडरवर लावली जाणारी झाडे भविष्यात हरित बीड मोहिमेला चालना देणार असून, रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनाही हिरवाईचा आनंद मिळणार आहे. कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांनी झाडांची मांडणी, पाणीपुरवठा आणि संरक्षणाचे काम वेगाने सुरू केले आहे.
या कामाची पाहणी करताना जन-जन की आवाजचे प्रतिनिधी शेख गालिब यांनी सांगितले की—
“बीड शहर सुंदर, स्वच्छ आणि हिरवे राहावे, यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे. प्रशासन योग्य दिशेने काम करत आहे.”
नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले असून, डिव्हायडरवर लावलेली झाडे भविष्यात शहराच्या सौंदर्यात भर घालणार आहेत.