logo

'महात्मा फुले हायस्कूल खानगाव ' येथे 'संविधान दिन' साजरा करण्यात आला.

काटोल प्रतिनिधी- न्यूज
आज 26 नोव्हेंबर 2025 बुधवारला 'महात्मा फुले हायस्कूल खानगाव' ता. काटोल या शाळेमध्ये संविधान दिवसाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. बागडे मॅडम यांनी केले. प्रास्ताविकेमध्ये त्यांनी सविधांन दिनाचा उद्देश समजून सांगितला. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून 'महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची संस्था' डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था
पुणे च्या वतीने 'समतादूत' काटोल तालुका प्रतिनिधी मा. श्री. मोहन जी पांडे सर प्रमुख पाहुणे यांनी संविधानामध्ये नागरिकांचे मूलभूत हक्क व कर्तव्य विद्यार्थ्यांना समजून सांगितले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्राचार्य श्री. धनंजय टेंभे सर यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानातील समता, न्याय, बंधुता, स्वातंत्र्य, एकता ही उद्दिष्टे सविस्तर समजून सांगितली. तसेच बरेच विद्यार्थ्यांनी सविधानावर आपले विचार मांडले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रकाश लोणकर सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री.रणजित उमप सर यांनी केले. कार्यक्रमाला विनायक ढोके, विवेक टेंभे, समस्त गावकरी व शालेय विद्यार्थी उपस्थित होते. संविधान दिनानिमित्त गावात प्रभातफेरी काढण्यात आली. कार्यक्रमाचा शेवट 'भारताचे संविधान' वाचन करून करण्यात आला.

18
1783 views