logo

माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत पालक मेळावा; शाळेच्या सुविधा पाहून पालक समाधानी*





शिवाजीनगर तांडा, ता. जळकोट, जि. लातूर – माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रादेशिक संचालक मा. माळवदकर साहेब यांच्या सूचनेनुसार शाळेतील विविध सुविधा पालक व विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आल्या.

या कार्यक्रमात सोलार वॉटर हीटर, फिल्टर पंप, विज्ञान साहित्य तसेच अन्य मूलभूत सुविधा यांचा पालकांना प्रत्यक्ष आढावा देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच शाळेमध्ये उपलब्ध असलेल्या सोयीसुविधांची सविस्तर माहिती पालकांनी जाणून घेतली.

कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय रामराव राठोड, प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक जयपाल राठोड, माध्यमिकचे मुख्याध्यापक तानाजी राठोड, सर्व शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुविधांच्या पाहणीनंतर पालक व विद्यार्थ्यांसाठी जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आनंदी आणि संवादात्मक वातावरणात पार पडलेल्या या मेळाव्याची सांगता करण्यात आली.

पालकांनी शाळेच्या कार्यप्रणालीबाबत समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.

103
2680 views