logo

Anil Sondkar Interview: ज्यांच्यासाठी काम केले, त्यांनीच डावलले..! भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी प्रमुख, जनता दलाचे कार्यकर्ते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेत

Anil Sondkar Interview: ज्यांच्यासाठी काम केले, त्यांनीच डावलले..!
भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी प्रमुख, जनता दलाचे कार्यकर्ते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पीएमटीचे माजी अध्यक्ष, दिवंगत काँग्रेस नेते बॅ. विठ्ठलराव गाडगीळ आणि सुरेश कलमाडी यांचे निकटवर्तीय व पुणे महापालिकेच्या निवडणुकांचा चालताबोलता विकीपीडिया अशी अनिल सोंडकर यांची ओळख. दिग्गजांच्या सहवासात असूनही महापालिका निवडणुकीत अनेकदा त्यांना डावलले गेले. आपल्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात अनेक निवडणुका त्यांनी अनुभवल्या. त्यांची माहिती त्यांच्याच शब्दांत...
मुंबईत 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली. त्याच्या पुढच्याच वर्षी पुण्यात सुभाष सर्वगौड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची शाखा सुरू झाली. माजी नगरसेवक अजय भोसले यांचे वडील जयंत भोसले हे या शाखेचे प्रमुख होते. दिवंगत शिवसेना नेते नंदू घाटे, काका वडके, माजी नगरसेवक प्रशांत बधे यांचे वडील लक्ष्मण बधे आदी मंडळी 1972-73 मध्ये शिवसेनेत आले. त्या वेळी मी एस. पी. कॉलेजला शिकत होतो आणि विद्यार्थ्यांचे नेतृत्व करीत होतो. माझी भाषणे व धडाडी पाहून बाळासाहेबांनी मला भारतीय विद्यार्थी सेनेचा प्रमुख केले होते. मुंबईतील लालबाग-परळ भागावर वर्चस्व असलेले गिरणी कामगारांचे धडाडीचे कम्युनिस्ट नेते कृष्णा देसाईंची 1970 मध्ये राजकीय वर्चस्वातून हत्या झाली.
त्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे वामनराव महाडिक निवडून आले. एका हत्या प्रकरणात येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या दिलीप हाटे यांच्या भेटीसाठी बाळासाहेब पुण्यात आले होते. त्याचवेळी सीमावादावरून पुण्यात उसळलेल्या दंगलीत शिक्षा झालेल्या शिवसैनिकांची मात्र त्यांनी भेटही घेतली नाही. त्यामुळे शिवसेनेचे पुण्यातील कार्यकर्ते नाराज झाले. तुरुंगात असलेले हे कार्यकर्ते पॅरोलवर सुटून आल्यानंतर पुण्यातील काही कार्यकर्त्यांनी सेना सोडायचा निर्णय घेतला. सुभाष सर्वगौड, बाबूराव रजपूत, डॉ. शंकरराव तोडकर यांच्यासह माझ्यासारखे काही कार्यकर्ते सेनेला रामराम करून जनता पार्टीत सामील झालो.

5
240 views