logo

स्व. नरसिंगराव बोडखे विद्यालयात संविधान दिन साजरा......

स्व. नरसिंगराव बोडखे विद्यालयात संविधान दिन साजरा......
रिसोड --तालुक्यातील स्व.नरसिंगराव बोडखे विद्यालय धोडप बु. येथे आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान दिन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री सज्जनराव बाजड सर तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव श्री संतोषराव गायकवाड साहेब उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकांमधून दिलीप भिसडे यांनी संविधानाचे महत्त्व प्रतिपादन केले.त्यानंतर शाळेतील काही विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर भाषण केले व भारताचे संविधानावर प्रकाश टाकला. त्यानंतर सर्व विद्यार्थी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मिळून संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन केले व संविधानाच्या रक्षणाची प्रतिज्ञा घेतली आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण रहाटे सर यांनी केले आभारप्रदर्शन श्री. बोडखे सर यांनी केले.या प्रसंगी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.

72
1689 views