logo

भारतीय संविधान गौरव दिन साजरा व 26/11च्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली

नांदेड सांगवी क्युरिओसिटी स्कूल सांगवी येथे आज 26नोव्हेबर रोजी भारतीय संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला व 26/11च्या हल्ल्यातील शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यानिमित्ताने संविधानाचे महत्व आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाला आदराने स्मरण करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात क्युरिओसिटी स्कूलचे संचालक प्रा.माधव खिल्लारे यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.आशा खिल्लारे यांनी संविधान पुस्तिकेचे पुजन हे पुष्प अर्पण करून 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले प्रा.माधव खिल्लारे यांनी संविधान गौरव दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व पुढे म्हणाले की, आपल्या देशाचे संविधान हे जगात सर्वात मोठे लिखित स्वरूपातील असून त्यांमध्ये समाविष्ट असणाऱ्या मुल्य स्वातंत्र्य,समता,न्याय व बंधूता यांचे महत्त्व सविस्तर पटवून देताना विद्यार्थ्यांमध्ये संविधान याबद्दल जागरूकता व लोकशाहीचे मूल्य अतिशय समर्पक शब्दांत समजावून सांगितले स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.आशा खिल्लारे यांनी संविधान सभेने 26नोव्हेबर 1949रोजी राज्यघटना स्विकारण्याचा व त्यामागील अथक परिश्रम सांगितले व तसेच त्यांनी संविधान निर्मितीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. या कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षिका अंजली मिस,मोहीनी मिस, सोनिया मिस ,अंकिता मिस व चवणे मावशी आदींनी परिश्रम घेतले

10
812 views
1 comment  
  • Madhav Ukandi Khillare

    संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा