logo

शिव उद्योग संघटनेच्या महिलांची सातासमुद्रापार गरुडझेप घेण्याची तयारी

शिव सेना प्रणित शिव उद्योग संघटनेच्या महिला, युवक,शेतकरी,गौपालक आणि वरिष्ठ नागरिक सक्षमीकरणाच्या उद्देश धोरणांतर्गत चालू असलेल्या अनेक महत्वाच्या प्रकल्पांमध्ये येणारी अत्यंत महत्त्वाची अडचण म्हणजे आपल्या महिलांनी बनविलेल्या मालाला योग्य बाजारपेठ न मिळाल्याने येणारे वैमनस्य आणि त्यामुळेच व्यवसाय करण्याची इच्छा असतानाही ती हिंमत करु न शकणाऱ्या महिला उद्योजकांसाठी शिव उद्योग संघटनेने एक नवी दिशा शोधली आहे.
अमेरिका आणि भारत येथे संयुक्तपणे काम करणाऱ्या मॅक्सलाॅर्ड आणि वैदिक स्वाद ह्या कंपन्यांनी आपल्या महाराष्ट्रातील महिलांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत विक्री करण्याची संधी निर्माण करुन देण्यासाठी शिव उद्योग संघटनेच्या माझा महाराष्ट्र बरोबर व्यावसायीक भागीदारी करण्याची तयारी दाखवली आहे. त्याचीच सुरुवात म्हणून दिनांक 25 डिसेंबर रोजी मुंबईतील दादरच्या देवराज हाॅल येथे एक अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. मॅक्सलाॅर्ड कंपनीचे संचालक श्री सहदेवजी कारंजकर आणि वैदिक स्वादचे अमेरिका स्थित संचालक श्री सतिशजी केळकर यांनी आपापल्या कंपन्यांची सदरहू प्रकल्पात काय भूमिका राहिल याची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. श्री केळकर हे खास ह्या कार्यक्रमाला अमेरिकेहून मुंबईत आले होते. शिव उद्योग संघटनेचे सरचिटणीस श्री प्रकाशजी ओहळे यांच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण प्रकल्प आकारास येत आहे. सदर प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील विविध कलाकार, व्यावसायिक, महिला, युवक, वरिष्ठ नागरिक यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे . संपूर्ण महाराष्ट्रात माझा महाराष्ट्रचे विक्री केंद्रे उभारण्याचा मानस शिव उद्योग संघटनेचे अध्यक्ष श्री दिपकजी काळीद यांनी व्यक्त केला त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात प्रथमतःच एखादी संघटना वरिष्ठ नागरिकांसाठी विविध मार्गांनी कमाईचे साधन मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे नमुद केले.
ह्या प्रकल्पाची सुरुवात महिलांनी बनविलेल्या उत्पादनांचे नमुने गोळा करुन झाली. ह्या मध्ये सर्व प्रकारचे उत्पादने समाविष्ट आहे.या सर्व उत्पादनांच्या योग्य त्या चाचण्या करुन निवडल्या गेलेल्या उत्पादनांची रितसर खरेदी विक्री चालू केली जाईल. सुमारे 1400 कोटींच्या ह्या प्रकल्पांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात जवळजवळ 300 ठिकाणी माझा महाराष्ट्रचे विक्री केंद्र चालू केले जातील ज्यामध्ये आपल्या महिलांनी बनविलेल्या जवळजवळ 500 पेक्षा जास्त उत्पादने आपल्यासाठी उपलब्ध असतील. आवश्यक असणारे सर्व सोपस्कार पूर्ण करून येत्या 8 मार्चला जागतिक महिला दिनाच्या मुहूर्तावर पहिले विक्री केंद्र चालू केले जाईल असे शिव उद्योग संघटनेचे अध्यक्ष श्री दिपकजी काळीद यांनी जाहीर केले.
महिलांची असलेली लक्षणीय उपस्थिती आणि बरोबर आणलेल्या आपल्या उत्पादनांचे नमुने कंपनीत जमा करण्यासाठी केलेली उत्साहित धडपड बघता लवकरच आपल्या महिला स्वयंपूर्णतेकडे यशस्वी वाटचाल करतील यात शंका नाही . महिलांसाठी आयोजित ह्या अधिवेशनात पुरुषांनीही आपली उपस्थिती नोंदवली.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिला पदाधिकाऱ्यांमध्ये प्रामुख्याने शिव उद्योग संघटनेच्या कार्याध्यक्षा शिल्पा ताई देशमुख , राज्य संघटक स्मिताताई देवकर पाटील, ईशान्य मुंबई महिला आघाडी प्रमुख भारतीताई मोरे , दक्षिण मध्य मुंबई महिला आघाडी प्रमुख वैशालीताई नाईक, वांद्रे महिला आघाडी विभाग प्रमुख ललिताताई स्वामी,नवी मुंबई महिला आघाडी प्रमुख रोहिणीताई वाघ, सिंधुदुर्ग जिल्हा महिला आघाडी प्रमुख रचनाताई नेरुरकर , सारीकाताई नकाशे , रिजवानाताई शेख, अंधेरी, घाटकोपर, चेंबूर आणि मुंबईतील सर्व विभागातील महिलांनी आपली उपस्थिती दर्शविली.
शिव उद्योग संघटनेचे सरचिटणीस श्री प्रकाशजी ओहळे, उपाध्यक्ष श्री गोकुळ लगड, विदर्भ संघटक श्री रघुनाथजी लोखंडे, राज्य कार्यकारिणी सदस्य श्री भास्कर चव्हाण, राज्य समन्वयक श्री संजय सावंत, त्याचप्रमाणे ईशान्य मुंबईतील सर्व पुरुष पदाधिकारी ह्या मेळाव्यास उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात जय जय महाराष्ट्र माझा या गीताने होऊन सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

19
2096 views