logo

*करण ससाणेला उपनगराध्यक्ष करून काहीही उपयोग झाला नाही - संजय फंड*

प्रेस नोट
श्रीरामपूर, अहिल्यानगर


*करण ससाणेला उपनगराध्यक्ष करून काहीही उपयोग झाला नाही - संजय फंड*


श्रीरामपूर (प्रतिनिधी) गेल्या निवडणुकीत आम्ही मनाचा मोठेपणा करून करण ससाणे यांना उपनगराध्यक्ष पद दिले.मात्र हे पद ते निट सांभाळू शकले नाही.फक्त ५ वर्ष उपनगराध्यक्ष म्हणून मिरवले ! अशी परखड टिका माजी नगराध्यक्ष संजय फंड यांनी केली आहे.
भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीनिवास बिहाणी यांच्यावर आरोप करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देतांना भाजपाचे संजय फंड म्हणाले की करण ससाणेंना पालिकेच्या सर्वसाधारण सभेत निट बोलता येत नव्हते ! मुद्दे मांडता येत नव्हते. त्यांना उपनगराध्यक्ष पद देऊन काहीही उपयोग झाला नाही.आता करण ससाणे नगराध्यक्षपदाची स्वप्न पहात असून नगराध्यक्षपद हे मिरविण्यासाठी नाही तर जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आहे . तेव्हा उपनगराध्यक्षपद जबाबदारीने सांभाळता आले नाही तेव्हा नगराध्यक्ष पदाची जबाबदार ससाणे पेलू शकणार नाही त्याच्यात ती गुणवत्ताच नाही अशी टिका संजय फंड यांनी केली.ते पुढे म्हणाले की दूसरे सेनेचे उमेदवार हे सुपारीबाज,सेटलमेंट करणारे असल्याचे सर्व श्रीरामपूरच्या जनतेला माहिती आहे.तेव्हा श्रीरामपूरचा रखडलेला विकास पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व मदतीने विकासाची नवी दिशा देण्यासाठी भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीनिवास बिहाणी यांना विजयी करणे हे श्रीरामपूरच्या जनतेने आता ठरवले आहे ! श्रीरामपूरात भव्य-दिव्य असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासाठी देखील निधी दिला आहे .पालीकेच्या नवीन इमारतीसाठी पालकमंत्री विखे पाटील यांनी साडेपाच एकर जागा दिली . श्रीरामपूरची वाढती लोकसंख्या पहाता १८१ कोटी पिण्याच्या पाणी योजनेला ना. विखे पाटील यांनी मिळवून दिले.
तरी केन्द्र सरकार व राज्य सरकारचा निधी मिळविण्यासाठी भाजपला साथ म्हणजे विकासाला साथ आहे . आरोग्यासाठी,रस्त्यासाठी मोठा निधि मंजूर झाला. अतिक्रमाणात नुकसान झालेल्यांचे पुणर्वसन पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील करणार आहेत .त्यामुळे नगर पालिका निवडणुकीत भाजपाचा विजय निश्चीत होणार असून श्रीरामपूर पालीकेवर भगवा फडकणारच असे ही शेवटी संजय फंड यांनी म्हटले आहे .

*सर्वात वेगवान,ताज्या व बेधडक बातम्या वाचण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप समुहामध्ये सामील व्हा :*
https://chat.whatsapp.com/Ihh80NAbRomJbBYlPdQqDS?mode=wwt


RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

2
67 views