जेजुरी निवडणुकीत ८० लाखांची घरपट्टी वसूल; नगरपरिषदेचा ताण कमी जेजुरी: जेजुरी नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2 डिसेंबर रोजी होत आहे. निवडजेजुरी शहरात
जेजुरी निवडणुकीत ८० लाखांची घरपट्टी वसूल; नगरपरिषदेचा ताण कमी जेजुरी: जेजुरी नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2 डिसेंबर रोजी होत आहे. निवडजेजुरी शहरात 5070 मालमत्ताधारक आहेत. साधारणपणे 2 कोटी 87 लाख रुपये चालू वर्षाची घरपट्टीची मागणी आहे. मागील थकबाकी 3 कोटी 28 लाख रुपये एवढी आहे. वसुली करण्यासाठी मार्च-एप्रिल महिन्यात नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी घरोघरी जात असतातणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरणारे उमेदवार आणि सूचकांनी सुमारे 80 लाख रुपये घरपट्टी भरली.प्रसंगी थकबाकीदारांच्या घरी जाऊन वाजंत्री वाजविणे, नळकनेक्शन तोडणे, फलकावर थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध करणे अशी कारवाई करीत असतात. असे असूनही मागील वर्षी केवळ 33 टक्के घरपट्टीची वसुली झाली. त्यामुळे थकबाकीदारांची संख्या मोठी आहे.जेजुरी नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक आठ वर्षांनी होत आहे. त्यामुळे नागरिकांत मोठा उत्साह आहे. 7 ते 17 नोव्हेंबरपर्यंत नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी उमेदवारी भरण्याची मुदत होती. उमेदवार तसेच सूचकांना घरपट्टी भरणे अनिवार्य असल्याने या कालावधीत सुमारे 91 अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवार व सूचकांनी मालमत्ता कर भरला.सुमारे 79 लाख 58 हजार रुपयांचा मालमत्ता कर जेजुरी नगरपरिषदेत जमा झाला. सुमारे 80 लाख रुपये मालमत्ता कर वसूल झाल्याने पालिका प्रशासनाचा घरपट्टी वसूल करण्याचा थोडाफार ताण कमी झाला आहे.