१५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आरेखक जाळ्यात
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाईजळगाव : पेट्रोलपंपाच्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी १५ हजार रुपयांची लाच घेणारा सार्वजनिक बांधकाम विभागाचा आरेखक वासुदेव धोंडू पाथरवट (वय ५३, रा. विश्वकर्मा भवन, मोहित नगर, जळगाव रोड, भुसावळ) याला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवार, दि. २४ रोजी रात्री सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात करण्यात आली.पेट्रोल पंपासाठी नाहरकत प्रमाणपत्र मिळावे, याकरिता तक्रारदाराने अर्ज दाखल केला होता. यावेळी आरेखक वासुदेव पाथरवट याने प्रमाणपत्र मिळवून देण्याकरुता सुरुवातीला दोन हजार आणि काम झाल्यावर १५ हजार द्यावे लागतील, अशी मागणी केली होती.त्याला सोमवारी १५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.