logo

सावनेर जनतेचा आवाज दमदार नाही आम्हाला कामदार नेतृत्व हवे.

*सावनेरचा जनतेचा आवाज: “दमदार नाही… आम्हाला कामदार नेतृत्व हवे”*

सावनेर शहरातील आजची बिकट परिस्थिती ही गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेवर येत-जात राहिलेल्या भाजप, काँग्रेस, आघाडी व इतर पारंपरिक पक्षांच्या ढिम्म, बेफिकीर आणि जनतेपासून तुटलेल्या कारभाराचे प्रत्यंतर आहे. या पक्षांनी उभे केलेले उमेदवार ३, ४ किंवा ५ वेळा सत्ता उपभोगूनही सावनेरच्या विकासासाठी शून्य कामगिरी दाखवत शहराला त्याच ठिकाणी अडकवून ठेवन्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे.

त्याहून गंभीर म्हणजे, स्वतःच्या कार्यकाळात काहीच काम न केलेले तेच चेहरे पुन्हा उमेदवारीसाठी पुढे करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न करत आहेत. पक्षांमध्ये वारंवार एकच घरातील दोन उमेदवारी देत कार्यकर्त्यांना डावलण्याची प्रवृत्ती वाढत असून त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. अनेक कार्यकर्ते पक्षांतर करण्यास भाग पडले हीच या पक्षांची खरी कामगिरी आहे.

एकीकडे स्वतःला “दमदार” म्हणवून घेणाऱ्या नेत्यांनी २५ ते ३० वर्षे सत्तेत राहूनही सावनेरला शून्य विकासाची भेट दिली, आणि आज पुन्हा “आम्हाला एक संधी द्या” अशी विनंती करत आहेत.
हे म्हणजे गाडीची हवा काढणाऱ्यानेच टोइंग व्हॅन घेऊन येण्यासारखे हास्यास्पद चित्र आहे.

दुसरीकडे आम आदमी पार्टी ही खऱ्या अर्थाने जनतेची पार्टी, जनहिताची पार्टी आहे.
सत्ता असो वा नसो, समस्यांचे राजकारण न करता त्या मार्गी लावण्याचा ध्यास AAP ने घेतला आहे. ज्या ठिकाणी AAP कार्यरत आहे, तिथे बहुतेक जनतेच्या समस्या नुसत्या ऐकल्या नाहीत, थेट सोडवल्या आहेत. सावनेरला आज पारदर्शक, प्रामाणिक व कामाला प्राधान्य देणारे नेतृत्व हवे आहे… आणि ते नेतृत्व AAP समोर उभे करत आहे.

सावनेरची जनता आता जागृत आहे. ३० वर्षांच्या ‘दमदारी’चे धडे तिने पुरेपूर घेतले आहेत.
या वेळेस जनता व्यक्ती नव्हे कामगिरी पाहून निर्णय घेणार आहे.

दमदार नाही… सावनेरला हवे आहे ‘कामदार’ नेतृत्व.
आणि ती भूमिका फक्त आम आदमी पार्टीच पार पाडू शकते असा जनतेचा ठाम विश्वास आहे.

5
1557 views