logo

प्रतिनिधी -उदेसिंग पाडवी (कात्री) Social Media Avtivist Nandurbar (MH)

ग्रामपंचायत कात्री येथे यंदाही ७० मीटर लांबीचा वनराई बंधारा...!

ग्रामपंचायत कात्री येथे यंदा ७० मीटर लांबीचा वनराई बंधारा...!
----------------------------------------------
प्रतिनिधी -उदेसिंग पाडवी
Social Media Avtivist
Nandurbar (MH)
----------------------------------------------
मुख्यमंत्री ग्राम समृद्ध अभियान व आदर्श ग्राम अभियान, नंदुरबार यांच्या अंतर्गत ग्रामपंचायत कात्री येथे यंदा ७० मीटर लांबीचा वनराई बंधारा लोकसहभागातून बांधण्यात आला. मागील पाच वर्षांपासून ग्रुप ग्रामपंचायत कात्री परिसरात विविध ठिकाणी वनराई बंधारे उभारण्याचे सातत्यपूर्ण कार्य होत असून, त्याच परंपरेनुसार या वर्षीही लाहा (लोकसहभाग) पद्धतीने बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले.
लोकसहभागातून उभारलेल्या या वनराई बंधाऱ्याचा पाटील पाडा परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे. शेतकरी या बंधाऱ्यातील पाणी उपसून विविध पिकांची शेती करत असून, उत्पादनक्षमतेत वाढ होत आहे.
या महत्त्वपूर्ण उपक्रमात पंचायत बंधू टीमचा सक्रिय सहभाग राहिला. त्यांच्या मनापासूनच्या सहभागामुळे व श्रमदानामुळे बंधाऱ्याचे काम अधिक गतिमान व प्रभावीरीत्या पूर्ण झाले.
ग्रामपंचायत कात्रीचे सरपंच संदीप वळवी यांनी ग्रामस्थांना वनराई बंधाऱ्याचे महत्त्व पटवून दिले व सर्वांना सामूहिकरीत्या कार्य करण्यासाठी प्रेरित केले. त्यांच्या नेतृत्वामुळे हा उपक्रम अधिक प्रभावी आणि यशस्वी ठरला.
या संपूर्ण बांधकाम प्रक्रियेकरिता सूर्यदर्शन शेतकरी प्रोडूसर कंपनी लिमिटेड, कात्री यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे बंधाऱ्याची रचना अधिक मजबूत, कार्यक्षम व कृषी उपयोगासाठी उपयुक्त ठरली.

154
7458 views