logo

वाळू संनियंत्रण समितीत अन्य ४ अधिकारी सदस्य

जळगाव : महसूल विभागाने जिल्हा व तालुकास्तरीय वाळू संनियंत्रण समितीच्या सदस्य म्हणून अपर जिल्हाधिकाऱ्यांसह पालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांचा समावेश केला आहे. त्यामुळे आता या समितीच्या नव्याने नियुक्त होणाऱ्या सदस्यांची जबाबदारी
वाढ होणार आहे.

जिल्हास्तरीय वाळू संनियंत्रण समितीचे अध्यक्षपद जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. तर सदस्य म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, अपर अधीक्षक, सा. बां. कार्यकारी अभियंता हे सदस्य तर जिल्हा खनिकर्म अधिकारी सदस्य सचिव म्हणून नियुक्त केले जातात. यांचा झाला समावेश

जिल्हास्तरीय समितीत अपर जिल्हाधिकारी, निवासी
उपजिल्हाधिकाऱ्यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. तर तालुकास्तरीय समितीत पालिकेचे मुख्याधिकारी व शहरी भागाचे उपायुक्तांचा समावेश करण्यात आला आहे.
ही जबाबदारी असणार

वाळूचे उत्खनन, साठवणूक आणि वाहतूक यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी वाइ संनियंत्रण समितीवर असते. या समितीकरखी वाळू व्यवस्थापनाचे नियोजन करणे, नियमांचे पालन करणे आणि बेकायदेशीर उत्खननाला आळा घालण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, जिल्ह्यातील स्थिती पाहता या दोन्ही समित्या कागदावरच असल्याचे स्पष्ट होत आहे.

5
581 views