logo

Pune Market Update: पुण्यातील फळभाज्यांच्या भावात 10 टक्क्यांची वाढ; आवक ‘जैसे थे’ कोथिंबीर व शेपू स्वस्त, कांदापात, मुळे आणि पालक महाग; मार्केट यार्ड

Pune Market Update: पुण्यातील फळभाज्यांच्या भावात 10 टक्क्यांची वाढ; आवक ‘जैसे थे’
कोथिंबीर व शेपू स्वस्त, कांदापात, मुळे आणि पालक महाग; मार्केट यार्डमध्ये मागणी जास्तफळभाज्यांच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ; मार्केट यार्डात 90 ट्रकमधून शेतमाल दाखलपुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. येथील घाऊक बाजारात रविवारी (दि. 23) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून मिळून सुमारे 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. आवकच्या तुलनेत मागणी जास्त आहे. त्यामुळे सर्वच प्रकारच्या भाज्यांच्या भावात 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती ज्येष्ठ अडतदार विलास भुजबळ यांनी दिली.परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि मध्यप्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे 15 ते 16 टेम्पो, कर्नाटक येथून कोबी 3 ते 4 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 50 गोणी, राजस्थान येथून गाजर 6 ते 7 टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा 2 ते 3 टेम्पो, कर्नाटक येथून भुईमूग शेंगा 2 टेम्पो, पंजाब, हिमाचल प्रदेशातून मटार 7 ते 8 टेम्पो, कर्नाटक येथून पावटा 2 ते 3 टेम्पो, तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी 400 ते 500 क्रेट, मध्यप्रदेश येथून लसणाची सुमारे 5 ते 6 टेम्पो तर इंदौर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा 40 ते 45 टेम्पो इतकी आवक झाली होती.स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 500 ते 550 गोणी, भेंडी 6 टेम्पो, गवार 3 ते 4 टेम्पो, टोमॅटो 6 ते 7 हजार क्रेटस, हिरवी मिरची 3 ते 4 टेम्पो, काकडी 6 ते 7 टेम्पो, फ्लॉवर 8 ते 10 टेम्पो, कोबी 6 ते 7 टेम्पो, ढोबळी मिरची 8 ते 10टेम्पो, गाजर 3 ते 4 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा सुमारे 125 टेम्पो इतकी आवक झाली.



5
89 views