logo

Pune Flower Market: चमेलीचा हंगाम संपला; फुलांचे दर स्थिर मार्गशीर्षात सुट्ट्या फुलांची आवक वाढली, लग्नसजावटीसाठी डच गुलाब, कार्नेशियन, जर्बेरा व लिलि

Pune Flower Market: चमेलीचा हंगाम संपला; फुलांचे दर स्थिर मार्गशीर्षात सुट्ट्या फुलांची आवक वाढली, लग्नसजावटीसाठी डच गुलाब, कार्नेशियन, जर्बेरा व लिलियमची मागणी कायम
पुणे : केसांमध्ये माळण्यासाठी लागणाऱ्या गजऱ्यात वापरल्या जाणाऱ्या सुगंधी चमेलीचा हंगाम संपला आहे. तर, मार्गशीर्ष महिना सुरू झाल्याने बाजारात सुट्ट्या फुलांची आवक वाढू लागली आहे. मात्र, अद्याप मागणी साधारण आहे. लग्नसराई सुरू असल्याने लग्नमंडपासह विविध कार्यक्रमांच्या ठिकाणी होणाऱ्या सजावटीसाठी डच गुलाब, कार्नेशियन, जर्बेरा, लिलियम, ऑर्चिड तसेच केशरचनेसाठी जिप्सोफिला आदी शोभिवंत फुलांना मागणी टिकून आहे. सर्व फुलांची आवक-जावक कायम असल्याने त्यांचे गत आठवड्यातील दर टिकून असल्याचे फुलांचे अडतदार सागर भोसले यांनी सांगितले.फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : 50-80, गुलछडी : 150-220, ॲष्टर : जुडी 16-25, सुट्टा 80-150, कापरी : 60-100, शेवंती : 100-150, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : 50-60, गुलछडी काडी : 80-200, डच गुलाब (20 नग) : 150-500, जर्बेरा : 80-120, कार्नेशियन : 250-300, शेवंती काडी 200-500, लिलियम (10 काड्या) 800-1200, ऑर्चिड 400-500, ग्लॅडिओ (10 काड्या) : 80-150, जिप्सोफिला : 300-400, लीली बंडल : 10-12.

4
202 views