
अवघ्या 24 तासांत उभारलेले अत्याधुनिक पोलीस मदत केंद्र —
उपविभाग भामरागड : फुलनार (कॅम्प गुंडूरवाही) येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना
अवघ्या 24 तासांत उभारलेले अत्याधुनिक पोलीस मदत केंद्र —
1000 सी–60 कमांडो, 21 BDDS टीम, नवनियुक्त पोलीस जवान, 500 विशेष पोलीस अधिकारी आणि खाजगी कंत्राटदार यांचे संयुक्त प्रयत्न!
2023 नंतर सुरक्षा पोकळी भरून काढण्यासाठी सुरू असलेल्या शृंखलेतील हे आठवे पोलीस मदत केंद्र.
राज्य शासनाने 28/10/2025 रोजी फुलनार (कॅम्प गुंडूरवाही) येथे स्थापना करण्यास दिलेली होती औपचारिक मंजुरी.
फुलनार (कॅम्प गुंडूरवाही) येथे पोलीस मदत केंद्राच्या उभारणीदरम्यान आयोजित जनजागरण मेळाव्यात स्थानिक नागरिकांना विविध साहित्यांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित महिलांना साड्या व चप्पल देण्यात आल्या, तर पुरुषांना घमेले, ब्लॅंकेट, स्वयंपाकातील भांड्यांचा संच आणि मच्छरदानीचे वाटप करण्यात आले. युवकांना लोअर पॅन्ट, टी-शर्ट, नोटबुक, पेन, स्कूल बॅग, कंपास तसेच चॉकलेट व बिस्कीट देऊन प्रोत्साहन देण्यात आले. लहान मुलांसाठी क्रिकेट बॅट, बॉल, स्टंप संच, व्हॉलीबॉल नेट आणि व्हॉलीबॉल देत पोलिसांनी क्रीडा व व्यक्तिमत्त्व विकासालाही चालना दिली. नागरिकांशी थेट संवाद साधत विश्वास, सुरक्षा आणि समाजाभिमुख सहभाग वाढवण्याचा हा उपक्रम विशेषतः यशस्वी ठरला.
#GadchiroliPolice #MaharashtraPolice #C60Commandos #CRPF #Bhamragad #SecurityForAll #PublicSafety
@dgpmaharashtra