logo

गोर सेना तर्फे जागतिक मेळाव्याची माहिती गावोगावी पोहोचविण्यास जोरदार प्रतिसाद

गोर सेना यांच्या वतीने येत्या २४ व २५नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या जागतिक मेळाव्याबाबत जनजागृती मोहीम राबवण्यात येत असून या उपक्रमाला गावागावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मेळाव्याच्या आयोजनाची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचावी यासाठी गोर सेना कार्यकर्त्यांनी विविध गावांमध्ये भेटी देत प्रबोधनात्मक उपक्रम राबवले.

या मोहिमेदरम्यान कार्यकर्त्यांनी गावातील प्रमुख चौक, बाजारपेठ, समाजमंदिर, शाळा परिसर आदी ठिकाणी जाऊन मेळाव्याचे उद्दिष्ट, कार्यक्रमांचे स्वरूप तसेच सहभागी होण्याचे महत्त्व याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच लोकांना आवाहन करण्यात आले की या मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहून गोर संस्कृती, परंपरा आणि एकात्मतेचा संदेश अधिक दृढ करावा.

गोर सेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “जागतिक मेळावा हा फक्त सांस्कृतिक कार्यक्रम नसून गोर समाजाच्या एकोप्याचे आणि प्रगतीचे प्रतीक आहे. त्यामुळे सर्वांनी सहभागी व्हावे हीच अपेक्षा.”

गावकरी नागरिकांनीही गोर सेनेच्या या उपक्रमाचे स्वागत केले असून मेळाव्यात उत्साहाने हजेरी लावण्याचे आश्वासन यावेळी जिल्हा सचिव डॉ. अर्जुन पवार, तालुका सचिव प्रल्हाद राठोड, समनक जनता पार्टी तालुकाध्यक्ष प्रा. रवी राठोड, तालुका प्रसिध्दी प्रमुख अरविंद राठोड, आदी उपस्थित दिले आहे.

56
5394 views
  
1 shares