logo

जनतेचा नारा एकच—प्रभाग 16 ला हवे महेश देशमुख – सौ. नीलिमा पाटील… विकासासाठी ठाम निर्धार!”

“जनतेचा नारा एकच—प्रभाग 16 ला हवे महेश देशमुख – सौ. नीलिमा पाटील… विकासासाठी ठाम निर्धार!”

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)

अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 16 मध्ये विकासाचा नवा अध्याय सुरू होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. प्रभाग 16 ‘अ’ मधून महेश प्रभाकर देशमुख आणि 16 ‘ब’ मधून सौ. नीलिमा विश्वनाथ (रवी) पाटील — या दोन्ही उमेदवारांच्या प्रामाणिक, लोकाभिमुख आणि निस्वार्थ कामाची छाप नागरिकांच्या मनात खोलवर उमटली आहे.

आज प्रभागात “सेवा हाच धर्म… विकास हाच ध्यास” हा भाव प्रत्येक नागरिकाच्या मनात निर्माण झाला आहे.
रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठ्याचे ताणलेले प्रश्न, तुटलेल्या गटारी, अपूर्ण नाले, ओपन प्लेसचे अंधारकोपरे, मुलांसाठी आवश्यक असलेले सुशोभीकरण, आणि दरदिवशी भेडसावणाऱ्या छोट्या-मोठ्या समस्यांमुळे प्रभाग त्रस्त आहे.
या सर्व समस्यांना एकदाच, ठामपणे आणि कायमस्वरूपी पूर्णविराम देण्यासाठी जनतेच्या मनात एकच आश्वासक पर्याय उभा राहिला आहे—

👉 “महेश देशमुख – सौ. नीलिमा पाटील”

नागरिकांचे मनोगत अतिशय स्पष्ट आहे :
“काम करणारे, दाखवून देणारे, आमच्या प्रत्येक गरजेच्या वेळी धावून येणारे नेतृत्व हवे… आणि म्हणूनच या वेळी आमचा विश्वास एका जोडीवर – विकासाच्या जोडीवर!”

प्रचारदौऱ्यात महिलांचा सहभाग, युवांची ऊर्जा, आणि ज्येष्ठ नागरिकांचे मार्गदर्शन—यामुळे संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण आहे.
प्रत्येक चौकात, प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक वस्तीमध्ये एकच आवाज घुमतो—

“या वेळी महेश देशमुख – नीलिमा पाटील… प्रचंड मतांनी विजयी करा!”

नागरिकांचा ठाम विश्वास असा आहे की—
✔️ प्रभागातील अपूर्ण रस्ते पूर्ण होतील
✔️ स्वच्छ पाण्याचा स्थिर प्रश्न सुटेल
✔️ गटारी, नाले, ड्रेनेजची सर्व कामे मार्गी लागतील
✔️ ओपन प्लेसचे हिरवे आणि आकर्षक सुशोभीकरण होईल
✔️ युवांसाठी उपक्रम, महिला सुरक्षेसाठी सुविधा, आणि सर्व नागरिकांसाठी पारदर्शक कारभार सुनिश्चित होईल

प्रभाग 16 च्या सर्वांगीण विकासासाठी, नागरिकांच्या भविष्याची नवी वाट उजळण्यासाठी, ‘विकासरूपी आशीर्वाद’ देण्याचे आवाहन मतदारांकडून होत आहे.

“जनतेचा विश्वास – विकासाचा श्वास…
महेश देशमुख – नीलिमा पाटील यांना द्या विजयाची खास साथ!”

18
734 views