
नारीशक्तीचा दीप पेटला,
प्रभाग सोळा ‘ब’ नवा मार्ग फुलला;
निलिमा पाटील उमेदवार ठरल्या,
रवी पाटीलांच्या निर्णयाने समाजही उजळला..!
नारीशक्तीचा दीप पेटला,
प्रभाग सोळा ‘ब’ नवा मार्ग फुलला;
निलिमा पाटील उमेदवार ठरल्या,
रवी पाटीलांच्या निर्णयाने समाजही उजळला..!
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
– विद्याविहार कॉलनीच्या प्रभाग क्र. 16 ‘ब’ मध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सतत सक्रिय असलेल्या रवींद्र पितांबर पाटील यांनी आपला उमेदवारीचा हक्क मागे घेऊन महिलांना प्राधान्य दिले आहे. या निर्णयानुसार त्यांनी आपल्या पत्नी सौ. निलिमा विश्वनाथ (रवि) पाटील यांची प्रभागातील अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे, जी महिला राखीव पदासाठी लढणार आहेत.
रवींद्र पाटील यांच्या या निर्णयामुळे प्रभागातील महिला वर्गात मोठा उत्साह निर्माण झाला असून, त्यांच्या सामाजिक समर्पणाची आणि महिला सशक्तीकरणाची भूमिका प्रशंसनीय ठरत आहे. त्यांच्या मातोश्री यांनीही नेहमीच सामाजिक कामाला प्राधान्य दिले आहे आणि प्रभागाचा विकास साधला आहे. त्याच मार्गदर्शनाखाली रवी पाटील यांनी आपल्या पत्नीला उमेदवारी दिल्याने सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये व प्रभागातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
विद्या विहार कॉलनी प्रभाग 16 ‘ब’ मध्ये रवी पाटील यांचे अभिनंदन होत आहे, तसेच प्रभागात त्यांचा मानणारा मोठा वर्ग असल्याने विजयाची शक्यता अधिक दृढ झाली आहे. हा निर्णय केवळ कुटुंबाच्या नव्या पिढीच्या नेतृत्वासाठी नाही, तर प्रभागातील महिला सशक्तीकरणाला चालना देणारा टप्पा म्हणूनही पाहिला जात आहे.
या पावलामुळे रवींद्र पितांबर पाटील यांचे नेतृत्व, कुटुंबाची सामाजिक समर्पणाची परंपरा आणि महिला सशक्तीकरणावर आधारित राजकीय धोरण यांचे उत्तम उदाहरण समोर आले आहे.