logo

नांदेड जिल्ह्यातील ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळे बनतायेत इतिहासप्रेमींचे आकर्षण केंद्र

जागतिक वारसा सप्ताह 2025 सुरू

नांदेड, दि : 21
दरवर्षी १९ ते २५ नोव्हेंबर दरम्यान साजरा होणाऱ्या जागतिक वारसा सप्ताह निमित्त नांदेड जिल्ह्यातील प्राचीन आणि सांस्कृतिक वारसा स्थळांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती उपक्रम राबविण्याचा ऊद्देशाने हा वारसा जतन आणि संवर्धनाच्या उद्देशाने विविध महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांची छायाचित्रे व माहिती संग्रहित करून नागरिकांमध्ये या वारसा स्थळांच्या जतन आणि संवर्धना बाबत आपुलकीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न आहे

जिल्ह्यातील प्रमुख वारसा स्थळांमध्ये होट्टल येथील चालुक्यकालीन हेमाडपंती मंदिरे, कंधार किल्ला, नांदेड किल्ला, तसेच अर्धापूर येथील १२व्या शतकातील केशवराज मूर्तीचे मंदिर या स्थळांचा समावेश आहे. होट्टल येथील ११ व्या शतकातील कल्याणी-चालुक्य स्थापत्यशैली, कंधार किल्ल्याची राष्ट्रकूटकालीन रचना आणि नांदेड किल्ल्याचा तब्बल दोन हजार वर्षांचा इतिहास अभ्यासकांना विशेष आकर्षित करतो.

याशिवाय जिल्ह्यातील तख्त श्री हजूर साहिब गुरुद्वारा, बिलोली मशीद आणि माहूरगडवरील रेणुकामाता मंदिर ही ठिकाणे धार्मिक, ऐतिहासिक आणि स्थापत्य दृष्ट्या महत्त्वाची असल्यामुळे दरवर्षी लाखो भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करतात.

वारसा सप्ताहाच्या निमित्ताने इतिहास प्रेमी, अभ्यासक, संशोधक आणि नागरिकांनी या स्थळांना भेट देऊन त्यांचे सौंदर्य व सांस्कृतिक महत्त्व जाणून घ्यावे, तसेच पुरातत्व महत्त्व असलेल्या ठेव्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचे आवाहन करताना शहरीकरण, नैसर्गिक आपत्ती आणि मानवी हस्तक्षेपामुळे वारसा धोक्यात येत असल्याने पुढील पिढ्यांसाठी हे अमूल्य ठेवे सुरक्षित ठेवणे अत्यावश्यक असल्याचे एक ईतिहास प्रेमी छायाचित्रकार म्हणून माझे मत व्यक्त करतो

जागतिक वारसा सप्ताहानिमित्त नांदेड जिल्ह्यातील या प्राचीन स्थळांचा अभ्यास, त्यांच्या छायाचित्रांचा संग्रह आणि जनजागृती उपक्रमातून जतन संवर्धन आणि नागरिकांमध्ये जतनाची भावना जागृत होईल, असा विश्वास व्यक्त करतो

10
762 views