logo

साखरखेर्डा–लव्हाळा रोडवर दुचाकींची समोरासमोर धडक : एक ठार, एक गंभीर जखमी

सिंदखेड राजा टलुक्का
प्रतिनिधी जुबेर शाह

साखरखेर्डा :साखरखेर्डा–लव्हाळा रोडवरील मोहाडी फाट्यानजीक काल (२० नोव्हेंबर) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार, देऊळगाव माळी येथील गणेश विश्वनाथ मते (वय २८) हा युवक पल्सर (क्र. MH 18 CD 6116) दुचाकीने साखरखेर्डा दिशेने जात होता. त्याचवेळी सवडद येथील अनिल कचरू खोलगाडगे (वय ३०) हा कारपेंटर आपल्या एचएफ डिलक्स (क्र. MH 37 9847) या दुचाकीने साखरखेर्डावरून सवडदकडे जात असताना मोहाडी फाट्याजवळ दोन्ही वाहनांची भीषण धडक झाली.
धडकेनंतर दोन्ही जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र, साखरखेर्डा येथील रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी चिखली येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान गणेश मते यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर अनिल खोलगाडगे यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मृत गणेश मते हा मेहकर येथील गाभणे हॉस्पिटलमध्ये कम्पाउंडर म्हणून कार्यरत होता. दिवसाचे देऊळगाव माळी येथे पानठेला चालवून रात्री तो मेहकरला नोकरीसाठी जात असे, अशी माहिती मिळाली आहे.
दरम्यान, ठाणेदार गजानन करेवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून दोन्ही दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

7
1177 views