logo

Aima media jan Jan ki avaj दिनांक :20/11/2025 pm5:38 Katraj Ghat Medical Waste: मेडिकलचा कचरा घाटात कुठं बी ‌’पसरा‌’ रात्रीच्या अंधारात भिलारेवाडी प

Aima media jan Jan ki avaj
दिनांक :20/11/2025 pm5:38
Katraj Ghat Medical Waste: मेडिकलचा कचरा घाटात कुठं बी ‌’पसरा‌’
रात्रीच्या अंधारात भिलारेवाडी परिसरात टाकला जातो धोकादायक जैववैद्यकीय कचरा; स्थानिकांचा संताप, तातडीने कारवाईची मागणी

पुणे : शहर आणि उपनगरांतील रुग्णालये, पॅथॉलॉजी लॅब तसेच क्लिनिक्समधून बाहेर पडणारा धोकादायक जैववैद्यकीय कचरा आता थेट कात्रजच्या जुन्या आणि नवीन घाटात ‌’थाटात‌’ फेकला जात असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. ‌’मेडिकल कचरा‌’ कुठं बी ‌’पसरा‌’ या प्रवृत्तीमुळे घाटाच्या वन विभागाच्या हद्दीला अक्षरशः कचराकुंडीचे स्वरूप आले असून, हा कचरा वन्यजीव आणि मानवी आरोग्यासाठी मोठा धोका निर्माण करीत आहे.जुन्या कात्रज घाटातील भिलारेवाडी वन विभाग क्षेत्रात रस्त्याच्या कडेला व झाडाझुडपांमध्ये रात्रीच्या अंधारात गाड्यांमधून भरून आणून हा कचरा टाकला जात आहे. यामध्ये मुदत संपलेली इंजेक्शन, सिरींज, रक्ताचे नमुने असलेल्या शेकडो बाटल्या, सलाइनच्या पिशव्या आणि औषधांच्या बाटल्यांचा समावेश आहे. हा जैववैद्यकीय कचरा उघड्यावर पडल्याने तो फुटून त्यातील दूषित घटक माती आणि पाण्यात मिसळण्याची भीती आहे, ज्यामुळे परिसरातील वन्यजीवांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.वन्यजीवप्रेमी आणि स्थानिकांनी हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर तीव संताप व्यक्त केला आहे. नियमानुसार, जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची एक शास्त्रोक्त प्रक्रिया आहे आणि त्यासाठी ‌‘पोक्सो‌’सारख्या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थेकडून कचऱ्याचे संकलन करून त्यावर मोशी येथील प्रकल्पात प्रक्रिया करणे अपेक्षित आहे, असे असतानाही काही बेजबाबदार वैद्यकीय व्यावसायिक आपला कचरा सार्वजनिक ठिकाणी फेकत आहेत, याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.

0
0 views