logo

कोल्हे बोरगाव ता बिलोली , विज्ञान युगात...सामाजिक व सांस्कृतिक प्रश्न तर आणखी भीषण! दलितांच्या वाट्याला आलेले बहिष्कृत जीवन व तितकीच वंचीतता कायम.

कोल्हेबोरगाव, तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथे, महाराष्ट्र राज्य शेतमजूर व इतर ग्रामीण मजूर युनियन (लाल बावटा) चे जिल्हासचिव कॉम्रेड मंजू व जिल्हाउपाध्यक्ष कॉम्रेड माधव यांनी, शेतमजुर व इतर ग्रामीण मजुरांची बैठक घेतली. या बैठकीत मजुरांच्या प्रश्नाच्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. मजुरांनी समस्यांचा पाढा वाचला. प्यायला पाणी नाही. रेशन भेटतं पण रेशन कार्ड नाहीत. रेशन कार्ड काढण्यासाठी एजंट 5 हजारपर्यंत मागणी करतात. हंगाम वगळता हाताला काम नाही. नळाद्वारे पाणीपुरवठा नाही. पाणी विकत घ्यावं लागतं. गावात प्रवेश करताच त्यांना सामोऱ्या आल्या त्या डोक्यावर भांडी घेऊन विकत पाणी वाहून नेणाऱ्या महिला. एकल महिलांचा आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक प्रश्न तर आणखी भीषण! दलितांच्या वाट्याला आलेले बहिष्कृत जीवन व तितकीच वंचीतता कायम. भूमिहीन. कसायला जमीन नाही. राहायला पक्के घर नाही. काही तर बेघर. निश्चित व सातत्याने मिळेल तथा पुरेशी मजुरी देईल असा रोजगार नाही. एक ना अनेक समस्या घेऊन चर्चा करायला कुणीतरी तरी आलंय. आमचं ऐकणारे कुणी तरी आहे. याचं समाधान त्यांनी बोलून दाखवलं. युनियनने कामाला सुरुवात केली. लढायाचा मार्ग निश्चित झाला. मनरेगाचे काम मागणी अर्ज भरणे व इतर बाबी ठरल्या. त्यासाठी गाव कमिटी गठीत करण्यात आली.

9
1742 views