logo

Aima media jan Jan ki avaj दिनांक 20/11/2025 am : 10:18 एरंडवणेत पहाटे रेस्टॉरंट-बारमध्ये दरोडा; शस्त्राच्या धाकाने रोकड लुटली मास्क घालून आलेल्या च

Aima media jan Jan ki avaj
दिनांक 20/11/2025 am : 10:18
एरंडवणेत पहाटे रेस्टॉरंट-बारमध्ये दरोडा; शस्त्राच्या धाकाने रोकड लुटली
मास्क घालून आलेल्या चौघांनी 15 ते 20 हजारांची रोकड घेऊन पळ काढला; डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखलपुणे : तोंडाला मास्क लावून आलेल्या चौघांनी एरंडवणे येथील एका रेस्टॉरंट ॲण्ड बारमध्ये शस्त्राच्या धाकाने लुटमार केली. गल्ल्यातील पंधरा ते वीस हजारांची रोकड जबरदस्तीने घेऊन लुटारूंनी पळ काढला. याप्रकरणी, लक्ष्मीकांत मोहन गुंजकर (वय 35, रा. आंबेगाव बुद्रुक) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चौघा अनोळखी आरोपींच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.19) पहाटे दीडच्या सुमारास अनंत रेस्टॉरंट ॲण्ड बार शॉप क्रमांक तीन, सूर्या टॉवर म्हात्रे बिज रोड एरंडवणे परिसरात घडला आहे.बुधवारी पहाटे तोंडाला मास्क लावलेले चौघेजण अनंत रेस्टॉरंट ॲण्ड बारमध्ये घुसले. त्यांच्याकडे धारधार हत्यारे होती. त्या हत्याराचा धाक दाखून त्यांनी बारच्या गल्ल्यातील पंधरा ते वीस हजारांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर चौघांनी तेथून पळ काढला.दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर गुंजकर यांनी डेक्कन पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. परिसरातील सीसीटीव्ही चित्रिकरणावरून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत, अशी माहिती डेक्कन पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरिषा निंबाळकर यांनी दिली.पहाटे मारहाणीचा प्रकार
शहरात सोमवारी (दि.17) पहाटेदेखील याच रेस्टॉरंट बारमध्ये चौघांनी एका तरुणाला मारहाण केली होती. या प्रकरणी, नारायण पेठेतील 27 वर्षीय तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार, डेक्कन पोलिसांनी चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी तरुण बाथरुमधून बाहेर येत होता. त्यावेळी चौघांनी त्याला धक्का लागल्याच्या कारणातून बेदम मारहाण केली. मारहाणीत लोखंडी कडे लागल्याने तरुण जखमी झाला.



0
67 views