logo

दिव्यांगांचे अद्ययावत सर्वेक्षण होणार



पुनर्वसन केंद्राच्या भेटीत जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश


जळगाव : जिल्हा दिव्यांग पुनर्वसन
केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी मंगळवारी भेट देऊन केंद्रात दिल्या जाणाऱ्या सेवा आणि सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. या भेटीत जिल्ह्यातील दिव्यांगांचे अद्ययावत सर्वेक्षण करून खरी संख्या निश्चित करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

या भेटीदरम्यान जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पद्ममनाथ म्हस्के आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन

केंद्राचे एस. पी. गणेशकर हे उपस्थित होते. दिव्यांगांचे सक्षमीकरण, आत्मनिर्भरता आणि गुणवत्तापूर्ण जीवन सुनिश्चित करणे हे जिल्हा प्रशासनाचे मुख्य असल्याचे उद्दिष्ट जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. व्याधीग्रस्त दिव्यांग मुलांसाठी उपलब्ध सर्वप्रथम केंद्रात विकासात विलंब आणि असलेल्या सेवांचे परीक्षण केले. त्यात फिजिओथेरपीसाठी उपलब्ध उपकरणे आणि उपचार पद्धतीचा आढावा घेतला. मुलांसाठी व पालकांसाठीच्या समुपदेशन सेवा, लवकर निदान आणि तातडीच्या उपचारांची प्रक्रियेविषयी त्यांनी सूचना दिल्या. त्यानंतर केंद्रातील लाभार्थी मुलांना मिळणाऱ्या सेवांची गुणवत्ता आणि प्रमाण पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले

जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व दिव्यांग नागरिकांचे अद्ययावत सर्वेक्षण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या सर्वेक्षणामुळे जिल्ह्यातील लाभार्थ्यांची खरी आणि अचूक संख्या समोर येईल. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे आणि गरजूंपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असे मत जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच केंद्रातील सुविधा, साधनसामग्री, मनुष्यबळ आणि उपचार सेवा अधिक सक्षम करण्यासाठी तातडीने नियोजन करण्यासाठी लवकरच बैठक घेतली जाणार आहे. अधिकाधिक दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत

केंद्राच्या सेवा पोहोचविण्यासाठी समन्वित आराखडा तयार करण्याचे संकेतही त्यांनी दिले.

53
1666 views