कुलगुरू,प्र-कुलगुरू यांची ज्ञानस्त्रोत केंद्र अभ्यासिकेला भेट; विद्यार्थ्यांशी थेट संवाद
जळगाव, (प्रतिनिधी) — कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ज्ञानस्त्रोत केंद्रातील अभ्यासिकेत कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी आणि प्र-कुलगुरु प्रा. एस. टी. इंगळे यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला.सकाळी १०.३० वाजता बिरसा मुंडा जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर कुलगुरु व प्र-कुलगुरु यांनी अभ्यासिका आणि ग्रंथालय विभागाला भेट देत विद्यार्थ्यांच्या अडचणी व सुविधा जाणून घेतल्या.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना तासिका नियमित होतात का, अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे का, आवश्यक पुस्तके ग्रंथालयातून उपलब्ध होतात का, तसेच पाणी, वीज आणि बैठक व्यवस्था समाधानकारक आहे का यासह अनेक प्रश्न विचारले.विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील अभ्यासिका व ग्रंथालयातील सुविधा समाधानकारक असून अभ्यासिकेमुळे अभ्यासाचे वातावरण उत्तम असल्याचे सांगितले.अभ्यासिकेत सुमारे १५० विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.