
साकोली नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी महिलांचीच जोरदार स्पर्धा
भावी शिलेदार कोण ठरणार?
आगामी नगरपरिषद निवडणुकीत साकोलीत नगराध्यक्ष पदासाठी महिलांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. विविध क्षेत्रात कामगिरी सिद्ध केलेल्या सात महिला उमेदवारांची नावे सध्या संभाव्य यादीत असून, त्यांच्या शिक्षण, समाजकार्य आणि राजकीय अनुभवामुळे सर्वच जणांची चर्चा शहरात रंगली आहे.नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी नामांकन अर्ज अनेक जणींनी आपले अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये समाजकारण, शिक्षण, आरोग्य, सामाजिक संस्था, तसेच महिला सक्षमीकरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिला आघाडीवर आहेत.प्रत्येक उमेदवाराची ओळख ही स्वतंत्र काम आणि जनआधारामुळे बळकट असल्याने चुरस अधिक वाढली आहे. उच्चशिक्षित महिला उमेदवार, डॉक्टरेट धारण केलेल्या शिक्षिका, सामाजिक संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या कार्यकर्त्या, महिला संघटनांमधील पदाधिकारी अशा विविध पार्श्वभूमीच्या महिलांनी नगराध्यक्षपदासाठी पुढाकार घेतला आहे.शहरातील मतदारांमध्येही यापैकी कोण नगराध्यक्षपदी विराजमान होणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. साकोलीच्या विकासासाठी सक्षम नेतृत्व कोण देऊ शकते यावर नागरिकांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.या सातही महिलांचे अनुभव आणि शैक्षणिक पात्रता पाहता निवडणूक अवघड व रोचक होणार हे स्पष्ट झाले आहे. यामध्ये सौ. देवश्री मनीष कापगते भाजपा, सौ सुनीता अशोक कापगते काँग्रेस, सौ भारती मोहन लांजे राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) सौ वंदना गुलाब पोहणे शिवसेना शिंदे गट , कोकीळा सचिन रामटेके वंचित बहुजन आघाडी, सौ संगीता नित्यानंद मेश्राम बीएसपी यांच्या कडून नागरिकांच्या अपेक्षा, विकासाचा दृष्टिकोन आणि कार्यशैली लक्षात घेता भावी नगराध्यक्ष कोण ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.