logo

*मोहपात बदलाची वादळे! नगराध्यक्ष पदासाठी येनूरकर ‘अपक्षाचा बुलंद बिगुल’, तर शेख–कावडकर प्रभाग ०४ मध्ये जनतेच्या विश्वासाची अजेय ताकद बनून उभे*

प्रतिनिधी:सूर्यकांत तळखंडे

मोहपा, दिनांक 19 नोव्हेंबर 2025 –
मोहपा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक ०४ हे सर्वाधिक लक्ष्यवेधी, चर्चेत आणि तापलेल्या वातावरणातील महत्त्वाचं रणांगण ठरत आहे. कारण इथे कोणत्याही पक्षाच्या झेंड्याशिवाय, कोणत्याही राजकीय शक्तीचा आधार न घेता, फक्त जनतेच्या विश्वासाच्या जोरावर उभी राहिलेली अपक्ष तिकडी नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार श्रीकांत येनूरकर, तसेच नबी महेबुल्ला शेख आणि प्रिती शिवशंकर कावडकर यांनी पक्षीय राजकारणाची समीकरणे पूर्ण बदलून टाकली आहेत.

नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष म्हणून प्रवेश केलेले श्रीकांत येनूरकर हे प्रभागातील सर्वाधिक कार्यक्षम, जमिनीवर काम करणारे आणि पारदर्शक स्वभावाचे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून पाणीटंचाई, कचरा व्यवस्थापन, रस्त्यांची दुरवस्था, लहान-मोठ्या नागरिकांच्या समस्या या सर्वांमध्ये त्यांनी सातत्याने केलेल्या संघर्षामुळे त्यांची प्रतिमा “जनतेचा नेता” म्हणून अधिक बळावली आहे.
त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की
“मी पक्षाचा आधार घेण्यासाठी नाही, इथल्या माणसांसाठी उभा आहे. जनतेचा विश्वास हेच माझं बळ, आणि हाच माझा खरा पक्ष.”
येनूरकर यांच्या या खुल्या भूमिकेमुळे प्रभागात बदलाची हवा अधिकच वेगाने वाहू लागली आहे.

याच प्रभागातून अपक्ष म्हणून उतरलेले नबी महेबुल्ला शेख हे गरीब वंचित जनतेसाठी काम करणारे, संकटात धावून पोहोचणारे आणि सर्वसामान्यांच्या भावनांना समजून घेणारे कार्यकर्ते म्हणून विशेष ओळखले जातात. अपघात, आजार, अडचणी किंवा मदतीची कुठलीही हाक शेख तत्काळ पोहोचतात, ही त्यांची ओळख प्रभागात पक्की झाली आहे.
त्यांची भूमिका आणखी ठाम
“जनतेचा हात माझ्या पाठीशी असेल, तर मला कोणत्याही पक्षाचा आधार लागत नाही. मी या प्रभागाचा माणूस आहे आणि इथल्या लोकांसाठीच उभा आहे.”

प्रभाग ०४ मध्ये महिला वर्गातून उत्तम प्रतिसाद मिळवत अपक्ष म्हणून आगेकूच केलेली प्रिती शिवशंकर कावडकर यांची लढतही विशेष दखल घेण्यासारखी ठरत आहे. प्रभागात स्वच्छता मोहिमा, महिलांच्या आरोग्याच्या समस्या, शाळकरी मुलींच्या गरजांवर लक्ष, वृद्धांना मदत, आणि स्थानिक नागरिकांसाठी सतत सक्रिय अशी त्यांची प्रतिमा आहे.
त्यांचा स्पष्ट संदेश
“आम्ही राजकारणासाठी नाही, जनतेच्या प्रश्नांसाठी आहोत. पक्ष नको जनतेचा आशीर्वाद पुरेसा आहे.”

या तिघांचे समान घोषवाक्य प्रभागातील प्रत्येक गल्लीमध्ये घुमत आहे
“जनतेचा विश्वास आमचं बळ!”

घराघरातील भेटीगाठी, नागरिकांच्या अडचणी ऐकून लगेच उपाययोजना सुचवणे, छोट्या-मोठ्या प्रश्नांना तत्परतेने उत्तरे देणे, विकासाची स्पष्ट दिशा मांडणे या सर्वांमुळे ही अपक्ष तिकडी आता निवडणुकीतील सर्वात चर्चेत आलेली ताकद ठरू लागली आहे.

प्रभाग ०४ मध्ये या तिकडीने उभ्या केलेल्या प्रभावामुळे पक्षीय उमेदवारांमध्ये स्पष्ट तणाव निर्माण झाला आहे. कारण जनतेने दिलेल्या प्रतिसादाने हे चित्र स्पष्ट होत आहे की, लोक राजकारणातील पक्षीय मतभेदांपासून कंटाळले आहेत आणि आता स्वच्छ, प्रामाणिक आणि कोणत्याही दबावाशिवाय काम करणाऱ्या पर्यायाकडे वळत आहेत.

मोहपातील नागरिक आता एकच चर्चा करत आहेत
“पक्षीय राजकारणाला मागे टाकत, जनतेच्या आधारावर उभ्या असलेल्या या अपक्ष तिकडीतून कोणाला मिळणार विजयाची गुढी?”

निकाल काहीही असो, पण एक गोष्ट मात्र निर्विवाद
प्रभाग ०४ मध्ये येनूरकर शेख कावडकर यांनी ‘जनसेवा आणि विश्वास’ या दोन गोष्टींवर उभा राहून मोहपाच्या राजकारणात नव्या युगाची सुरुवात केली आहे.

327
15257 views