
शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री.माऊली जगताप यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन..
(पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)
पुणे-पिंपरी-चिंचवड शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना पुणे जिल्हाध्यक्ष माऊली जगताप यांच्या शिवसेना-युवासेना व श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे कार्याध्यक्ष बाबासाहेब चव्हाण, सचिव अमित पटनाकर, महानगरप्रमुख राजेश वाबळे, शहरप्रमुख निलेश तरस, शहर संघटक संतोष सौंदणकर, शहर संघटिका सरिता साने, युवासेना जिल्हा प्रमुख राजेंद्र तरस, उपशहरप्रमुख राजेश आडसूळ, राज्य संपर्क प्रमुख रऊफ पटेल, सहसंपर्कप्रमुख मनोज खैरे, रविंद्र कुवर, दादाजी पगार, माधव पवार, उमेश बोरसे, गुलाबराव सैंदाणे, डॉ. विजय पाटील, गौतम बागूल, राजेंद्र निकम, शरद सोनवणे, बी. के.
पाटील, जितेंद्र पाटील, प्रल्हाद पाटील, उमेश राजपूत आदी उपस्थित होते.उद्घाटन प्रसंगी माऊली जगताप म्हणाले, या नव्या कार्यालयाच्या माध्यमातून गोरगरीब, कष्टकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहणार आहे. हीच बाळासाहेबांच्या विचारांची खरी आदरांजली आहे. शिवसैनिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीने वातावरण ढोल-ताशांच्या गजराने दुमदुमले. संघटन विस्तार आणि सामाजिक बांधिलकीसाठी हे कार्यालय महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सर्व मान्यवरांनी मत व्यक्त केले.