logo

अल्पवयीन मुलीला त्रास देणाऱ्या व विनयभंग करणाऱ्या आरोपीस तात्काळ अटक. व २० तासांत तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल. पोलिसांची अत्यंत वेगवान

अल्पवयीन मुलीला त्रास देणाऱ्या व विनयभंग करणाऱ्या आरोपीस तात्काळ अटक. व २० तासांत तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल. पोलिसांची अत्यंत वेगवान कारवाई*

लातूर शहरातील गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीचा गंभीर प्रकार घडल्याची तक्रार दि. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्राप्त झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता लातूर पोलिसांनी त्वरित, काटेकोर व संवेदी भूमिकेतून गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी कारवाई करून आरोपीस अटक केली. व केवळ २० तासांच्या अल्पावधीत तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल करण्याचे उल्लेखनीय कार्य पार पाडले.

पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार दि. १७/११/२०२५ रोजी दुपारी साधारण २.३० वाजता आरोपी इसराईल कलीम पठाण, वय २७ वर्षे, रा. गौसपुरा, लातूर हा फिर्यादीच्या घरात अनधिकृतरीत्या शिरला व पीडित मुलीस जबरदस्ती करून हात धरून विनयभंग केला.तसेच यापूर्वीही आरोपीने पीडित मुलीचा वारंवार पाठलाग केला होता.तिच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या.
पीडित मुलीला व तिच्या कुटुंबीयांना वाढत्या त्रासामुळे मानसिक दबाव निर्माण झाला होता. तक्रार प्राप्त झाल्यानंतर प्रकरण अत्यंत संवेदनशील मानून त्वरित गुन्हा नोंद करण्यात आला.

पोलीस स्टेशन गांधी चौक येथे गुन्हा क्रमांक ५३६/२०२५ कलम ७४, ७८, ३३३, ३५१(२)(३) – भारतीय न्याय संहिता (BNS) सह कलम ८, १२ – बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO Act)अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
गुन्हा नोंद होताच पोलीस अधीक्षक, श्री. अमोल तांबे यांनी घटनेचा आढावा घेऊन त्वरित कारवाईचे निर्देश दिले. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक, श्री.मंगेश चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री. समीरसिंह साळवे यांचे मार्गदर्शनात गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांनी तातडीने दोन स्वतंत्र शोधपथके तयार केली.त्या पथकांनी
आरोपीचे रहिवास व हालचालींची गुप्त माहिती गोळा केली, संभाव्य ठिकाणांची पाहणी करून आरोपी इसराईल कलीम पठाण यास स्थानिक पथकाने ताब्यात घेतले.आरोपीस ताब्यात घेऊन कायदेशीर अटक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
तपास अधिकारी पोउपनि श्री गणेश चित्ते यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात तत्परतेने तपास पूर्ण करून आरोपी विरुद्ध सबळ पुरावा संकलित करून आरोपीसह आवश्यक कागदपत्रांसह मा. न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले. वरील सर्व प्रक्रिया अत्यंत बारकाईने पार पाडून केवळ २० तासांत तपास पूर्ण करण्यात आला. ही संवेदनशील व वेगवान कारवाई पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांच्या सूचने व निर्देशावरून पथकामधील पोउपनि गणेश चित्ते, मपोउपनि श्रीमती पोवार, सफौ राजेंद्र टेकाळे, पोलीस अंमलदार प्रकाश भोसले, रविसन जाधव,राहुल दरोडे, सचिन चंद्रपाटले, योगेश चिंचोलीकर, रवि कानगुले, सचिन जाधव, शिवानंद गिरबोने, महिला पोलीस अंमलदार संध्या कांबळे, सुमन कोरे,लता बनसोडे, राखी गायकवाड यांनी केली आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पथकाने तत्परतेने एक संवेदनशील प्रकरणात विलंब न होता आरोपीविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली असून लातूर पोलिसांची संवेदी, जलद आणि कायदेशीर कामगिरी केली आहे.

अल्पवयीन मुलीचे संरक्षण आणि न्यायप्रक्रियेतील पारदर्शकता.

गुन्हा नोंद होताच आरोपीची अटक करून बारकाईने तपास पूर्ण करून आरोपी विरुद्ध सबळ पुरावा हस्तगत करून गांधी चौक पोलीस ठाणे कडून अवघ्या २० तासांत आरोपपत्र मा. न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी लातूर पोलीस दलाच्या संवेदी आणि नागरिक-केंद्रित कार्यपद्धतीचे प्रतीक असून लातूर पोलीसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की,अल्पवयीन मुलींवरील अत्याचार, छेडछाड, त्रास किंवा संशयास्पद हालचालींची तात्काळ पोलीसांना माहिती द्यावी.
Latur Police Department DIO,latur, ज़िल्हा माहिती कार्यालय, लातूर लातूर शहर महानगरपालिका

4
256 views