राष्ट्रीय भारत भूषण पुरस्काराने मृणाल कुलकर्णी सन्मानित
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी - साऊ-ज्योती सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आयोजित विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा कार्यांचा सन्मान सोहळा म्हणून राष्ट्रीय भारत भूषण पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. त्यामध्ये सिनेअभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनाही हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अ.भा. मराठी चित्रपट अध्यक्ष मेघराजे भोसले, प्रा डॉ शंकर अदानी, पोलीस उपनिरीक्षक पुनम पाटील, वैशाली शेलार, युवराज कुमार, संदीप शर्मा, विष्णू देशमुख, संभाजीराजे जाधवराव, केतकी गावडे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन हळदे, विकास उबाळे, श्रीकांत जोगदंड, अँड.निता शेळके, डॉ उल्हास मोगलेवार, प्रफुल आदी मान्यवरांच्या हस्ते अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात आले.