logo

Aima media jan Jan ki avaj Time : 8:16 date: 19/11/2025 Narhe Development Issue: नऱ्हे विकासाच्या दृष्टिक्षेपात येणार कधी? रस्ते-डीपी रोड, पाणीपुरव

Aima media jan Jan ki avaj
Time : 8:16 date: 19/11/2025
Narhe Development Issue: नऱ्हे विकासाच्या दृष्टिक्षेपात येणार कधी?
रस्ते-डीपी रोड, पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, ड्रेनेज, पूरस्थिती, कचरा व्यवस्थापनासह अनेक समस्या कायम — आगामी महापालिका निवडणुकीत नऱ्हेच्या विकासाचा मुद्दा निर्णायक
दत्तात्रय नलावडे, मिलिंद पानसरे

प्रभाग क्रमांक : 34 नऱ्हे-वडगाव बुद्रुक-धायरी

वडगाव, धायरी या भागात महापालिकेच्या माध्यमातून काही विकासकामे झाली असली, तरी नव्याने समाविष्ट झालेले नऱ्हे गाव अजूनही विकासापासून कोसो दूर आहे. प्रभाग क्रमांक चौतीसमध्ये सोसायट्या, गावठाण आणि वस्ती भाग असा संमिश्र भाग असून, विविध भागांतील समस्याही वेगवेगळ्या आहेत. धायरीतील डीपी रस्ते अद्यापही अर्धवट आहेत. नऱ्हे गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मुख्य रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीला नागरिक कंटाळले आहेत, यासह पाणीपुरवठा, कचरा, अतिक्रमणे, स्वच्छतागृहांचा अभाव, पावसाळ्यात निर्माण होणारी पूरस्थिती आदी समस्या या प्रभागात कायम आहेत.

2
100 views