logo

जळगाव जिल्ह्यात नगरपरीषद व नगरपंचायती निवडणुकांसाठी ३५४२ उमेदवारी अर्ज

जळगाव जिल्ह्यातील १६ नगरपरिषद आणि ३ नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्जांचा मोठा ओघ पाहायला मिळाला आहे. सदस्यपदाच्या ४६४ जागांसाठी तब्बल ३५४२ अर्ज, तर नगराध्यक्ष पदाच्या १८ जागांसाठी २२९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
जिल्ह्यात चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, अंमळनेर, चोपडा, यावल, नशिराबाद, वरणगाव, पारोळा, धरणगाव, एरंडोल, फैजपूर, भुसावळ, जामनेर, सावदा आणि वरणगाव या १६ नगरपरिषदांचा समावेश आहे. तर शेंदुर्णी, मुक्ताईनगर आणि बोदवड या नगरपंचायतींत निवडणूक होणार आहे.
बोदवड वगळता उर्वरित १८ ठिकाणी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल.
निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील ३७७ मतदार केंद्रांवर
१२९० कंट्रोल युनिट्स
२७४३ बॅलेट युनिट्स
यांची व्यवस्था करण्यात येत आहे.
जिल्हाभरातील सर्व पक्षांचे उमेदवार व कार्यकर्ते आता प्रचाराच्या तयारीला वेग येत आहेत.

12
786 views