logo

Aima media jan Jan ki avaj दिनांक 17 /11/2025 आम्ही 11:47 Juvenile Crime Pune: पुण्यात अल्पवयीन गुन्हेगारीची वाढ चिंताजनक; टोळीयुद्धातून गंभीर घटनापु

Aima media jan Jan ki avaj
दिनांक 17 /11/2025 आम्ही 11:47
Juvenile Crime Pune: पुण्यात अल्पवयीन गुन्हेगारीची वाढ चिंताजनक; टोळीयुद्धातून गंभीर घटनापुणे : कोंढवा आणि बाजीराव रस्त्यावर दिवसाढवळ्या घडलेल्या निर्घृण खुनाच्या घटना नक्कीच तुम्हा-आम्हाला विचार करण्यास भाग पाडणाऱ्या आहेत. ओठावर मिसरूड न फुटलेली ही पोरं कोयता, सत्तूर, पिस्तूल आणि दगडाची भाषा बोलून एकमेकांचे रक्तचरित्र रेखाटू लागली आहेत. ग्लॅमरच्या आकर्षणातून अल्पवयीन मुलांच्या डोक्यात भाईगिरीची हवा शिरू पाहते आहे. तर दुसरीकडे कायद्यातील पळवाटांचा आधार घेत सराईत गुन्हेगारांकडून देखील प्रतिस्पर्ध्याच्या गेम सेट करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर केला जात असल्याचे दिसून येते.2021 ते ऑक्टोबर 2025 या पाच वर्षाच्या कालावधीत शहरात 2 हजार 244 मुलांवर तब्बल 1 हजार 400 पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, मारामारी, हत्याराच्या धाकाने दहशत निर्माण करणे अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. एकीकडे सराईत गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यात बहुतांश प्रमाणात पोलिसांना यश आले असले तरी, दुसरीकडे मात्र वाढती विधीसंघर्षित गुन्हेगारी (अल्पवयीन गुन्हेगारी) रोखण्याचे मात्र पोलिसांसमोर आव्हान कायम आहे. शहरातील गुन्हेगारीच्या घटना पाहिल्या तर खून, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा मोठा सहभाग असल्याचे निदर्शनास आले आहे. अल्पवयीन गुन्हेगार हा कधीच जन्माला येत नाही, तर परिस्थिती, समाज, इतरांचे अनुकरण, ग्लॅमरस जीवन जगण्याचा मोह, डोक्यात भाईगिरीची हवा त्यांना गुन्हेगारी वाटेवर घेऊन येते. लहान मुलांना ते करत असलेल्या गुन्हेगारी कृत्याचे भविष्यात काय परिणाम होतील याची कल्पनादेखील नसते. संतापाच्या, भावनेच्या भरात त्यांच्या हातून अनेक कृत्ये घडत, असल्याचे समोर येत आहे.
सर्वात गंभीर प्रकार म्हणजे आई-वडिलांशी तुटलेला संवाद, किंवा घरातील इतर अनेक गुंतेही त्यासाठी कारणीभूत ठरतात. लहान मुले ही अनुकरणशील असतात, घरात व समाजात घडणाऱ्या घटनांचे अनुकरण करत असतात. मद्यप्राशन करून आल्यानंतर वडिलांकडून आईवर होणारे अत्याचार, होणारी मारहाण, घरातील सासू-सासरे सुनेला मारहाण करताहेत, असली हिंसक दृश्ये रोज पाहत अनेक मुले मोठी होतात. त्यांच्या मनावर या हिसेंचेही विपरित परिणाम होत राहतात. त्यामुळे अनेक जण अनवधानाने गुन्हेगारी मार्गावर जातात.

9
60 views