logo

लाडकी बहीण योजनेच्या KYC मुदतवाढ आता 31 डिसेंबर पर्यंत करता येणार KYC

Aima Media News chandrapur
राजुरा चंद्रपूर: राज्यातील लाडक्या बहि‍णींसाठी मोठी खूशखबर हाती आली आहे. लाडकी बहीण योजनेची E-KYC करणाऱ्या महिलांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सरकारने e-KYC साठी मुदतवाढ ही ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे e-KYC करणे बाकी असलेल्या लाडक्या बहि‍णींना पुरेसा अवधी मिळणार आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे. याबाबत दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी e-KYC प्रक्रिया करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या. परंतु, गेल्या काही दिवसांत आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे, 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतील अनेक पात्र भगिनींना e-KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे. या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
लाडकी बहीण योजनेच्या e-KYC करण्याची अंतिम मुदत आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे. त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे e-kyc करावे आणि त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र आणि घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला आणि बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे. या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे. ज्या भगिनींनी अद्याप e-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. विशेष म्हणजे यासंदर्भात राज्याचे माजी वित्त वन व नियोजन मंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाडक्या बहिणीच्या e-KYC प्रक्रिया बाबत 30 दिवसाची मुदतवाढ देण्याची मागणी केली होती .

0
1031 views