logo

आदिवासींना तात्काळ नुकसान भरपाई द्या

प्रतिनिधी
विनोद एकनाथ भगत
पेन, ( वा ) वन हक्क कायद्यांतर्गत प्राप्त झालेल्या पाबळ खोऱ्यातील दावेदार आदिवासींना तहसीलदार पेन यांनी खास आदेश काढून कृषी खाते ग्रामसेवक व तलाठी यांना आदेश दिल्याप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामे केले आहेत, मात्र पंचनामे होऊनही या आदिवासींना अजूनही नुकसान भरपाई नसल्याने आदिवासींमध्ये तीव्र नाराजी आहे.
यासंदर्भात नुकतीच बर्डावाडी येथे साखर संस्थेच्या वतीने खुमा दोरे यांच्या अध्यक्षतेखाली वन हक्क दावेदार आदिवासींचा भव्य मेळावा घेण्यात आला या मेळाव्याला मोहाडी, झापडी,गवळावाडी, देवमाळ, पेडका, तुरमाळ, बाहेरमाळ, चाफेकर, चितळकोंड, धारवाडी, बोरीचा माळ, पाहीरमाळ, चिचवाडी, गंगावणे, आदिवासी वाडीतील पण हक्क दावेदार मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी आदिवासींनी मनोगत सांगितले एकूण १७१ गावे प्रांत कार्यालयात प्रलंबित आहेत तसेच अनेक दावेदारांच्या दोन ते तीन ठिकाणी जमिनी असूनही वन खात्याने दावे करताना या जमिनी मोजल्या नसल्याने अनेक आदिवासींना कमी जमीन मिळाली आहे
दळी जमीन धारकांचा मेळावा होणार : अरुण शिवकर
या मेळाव्यात साकव संस्थेचे सचिव अरुण शिवकर यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, यापुढील कार्यक्रम म्हणून दावेदारांपैकी काही दावेदार मयत असून त्यांच्या वारस नोंद करण्याबाबत अर्ज भरण्याची मोहीम सुरू केली असून लवकरच याच धर्तीवर दळी जमीनधारकांचा मेळावा घेणार आहे. या मेळाव्याला संस्थेच्या कार्यकर्त्या, मंजुळा पाटील व उमेश द्वारे यांनीही मार्गदर्शन केले या मेळाव्यात संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग तुरे, उपाध्यक्ष डॉ. सुरेंद्र धुमाळ, भूषण वाघमारे, नयना कदम, नामदेव रामबाण, ठुम्ना राजीव बंगार, पिठ्यादोरे आदि आदिवासी कार्यकर्ते हजर होते.

12
695 views
1 comment