
अर्जुन पाटील खरात यांना करडा पंचायत समिती सर्कलमध्ये प्रथम पसंतीचे चित्र दिसून येत आहे
*करडा पंचायत समितीसाठी अर्जुन पाटील खरात यांना व्यापक जन समर्थन*
रिसोड :- गेल्या तीन दशकांपासून सामाजिक कार्याचा विडा उचलत सातत्याने जनसेवा करणारे अर्जुन पाटील खरात आता करडा पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आमदार अमित झनक यांच्या नेतृत्वाखाली करडा गणातून उमेदवारीची तयारी सुरू असून सर्वसामान्य जनतेतून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दीर्घकाळ सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले अर्जुन पाटील हे आमदार अमित भाऊ झनक यांचे कट्टर एकनिष्ठ कार्यकर्ते. सामाजिक उपक्रम, संकटकालीन मदत आणि सर्वसामान्यांचा आवाज बनणे— हे त्यांचे कार्य सातत्याने सुरु आहे.
कोरोना काळातही अत्यंत जोखमीच्या परिस्थितीत गरजूंना मदत, औषधे, अन्न साहित्य, जनजागृती अशा विविध उपक्रमांद्वारे त्यांनी मोलाचे योगदान दिले. संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी, महिलावर्ग आणि शेवटच्या घटकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने चळवळ उभी केली.
याचबरोबर आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, नेत्र तपासणी, युवकांसाठी रोजगार मार्गदर्शन, उद्योग स्थापना प्रोत्साहन अशा उपक्रमांतून त्यांनी मोठा जनसंपर्क आणि विश्वास निर्माण केला. “अहद ऑस्ट्रेलिया–तसदी कॅनडा” अवघा मुलुख आपला
या कल्पनेतून परदेशातील रोजगार मार्गदर्शन देत अनेकांना संधी उपलब्ध करून दिली. त्याचप्रमाणे स्वतः शेतीशी घट्ट नाते ठेवून आधुनिक शेती पद्धती, उत्पादनवाढ यावर त्यांनी प्रयोग केले. या सर्व कामांचा प्रभाव जनमानसावर उमटला असून करडा पंचायत समिती गणातील मतदार त्यांच्या बाजूने उभे राहिल्याचे चित्र दिसत आहे. सामाजिक बांधिलकी, एकनिष्ठता आणि कार्यक्षम नेतृत्व यांमुळे अर्जुन पाटील खरात यांचे नाव आज सर्वत्र चर्चेत आहे.