logo

पाचोरा : रोटरी क्लब पाचोरा भडगाव तर्फे बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला त्या वेळी शाळेतील लहान मुलांनी बालदिनाचा आनंद घेतला

पाचोरा : रोटरी क्लब पाचोरा भडगाव तर्फे बालदिन उत्साहात साजरा

बालदिनानिमित्त रोटरी क्लब पाचोरा भडगाव यांनी *निर्मल इंटरनॅशनल स्कुल प्री प्रायमारी, पुनगाव रोड,पाचोरा* येथे आरोग्य विषयक जागरूकता या विषयावर लहानश्या बालगोपाल यांचेसाठी सूंदरसा छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी सर्वं चिमुकल्या बालगोपाल यांचेशी डॉ राहुल पटवारी बालरोगतज्ञ पाचोरा यांनी हसत खेळत संवाद साधला.चांगल्या आरोग्यदायी सवयी व साथीचे आजार होऊ नये म्हणून घ्यावायची काळजी यावर मार्गदर्शन केले.यावेळी मंचावर रोटरी क्लब पाचोरा भडगाव अध्यक्ष डॉ मुकेश तेली ,सचिव डॉ अजयसिंग परदेशी,रोटरी क्लब पाचोरा भडगावचे सदस्य भरत सिनकर,चंद्रकांत लोढाया,डॉ कुणाल पाटील,रावसाहेब पाटील,डॉ बाळकृष्ण पाटील,संजय कोतकर,पिंकी जिनोदिया,प्राचार्या फरीदा मॅडम तसेच शाळेतील शिक्षिका व इतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमानंतर उपस्थित सर्वं विद्यार्थ्यांना रोटरी क्लब अध्यक्ष डॉ मुकेश तेली यांनी खाऊचे वाटप करून बालदिन उत्साहात साजरा केला.

5
89 views