logo

भारतीय जनता पार्टी चा फटाके फोडून जल्लोष बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप सरकार

प्रतिनिधी -लक्ष्मण बिल्हारे
मंठा (प्रतिनिधी ) - आज दिनांक 14 नोव्हेंबर रोजी बिहार विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमताने भारतीय जनता पार्टीचे निर्विवाद वर्चस्व स्थापन झाले असून , माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनरावजी लोणीकर व भाजपा प्रदेश सचिव राहुल भैय्या लोणीकर यांच्या सूचनेने मंठा शहरात भारतीय जनता पार्टी मंठा तालुकाच्या वतीने फटाके वाजवून व पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गणेशराव खवणे, मा.तालुकाध्यक्ष सतीश निर्वळ , विठ्ठल मामा काळे, कैलास बोराडे ,नगराध्यक्ष वैजनाथ बोराडे, नगरसेवक दीपक बोराडे , युवा मोर्चा अध्यक्ष आनंद जाधव, नगरसेवक विकास सूर्यवंशी, नगरसेवक एन. डी दवणे, मनोज देशमुख, ए.टी चव्हाण सर, डॉ. दत्तात्र्य काकडे, विकास जाधव, दिनेश सराफ, विनोद गायकवाड, सतीश बोराडे , दिलीप राठोड, पंकज राठोड, माणिक पवार,तोफीक कुरेशी, कपिल तिवारी, बद्रुद्दीन शेख, श्री चव्हाण, गोकुल राठोड , नंदू टकले यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष नितीन राठोड यांनी बोलताना सांगितले की , बिहार विधानसभा निवडणुकीतील यश हे सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद व भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे साकार झाला असल्याचे सांगितले तसेच बिहार विधानसभा निवडणूक प्रमाणे महाराष्ट्रात तसेच मंठा तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनरावजी लोणीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा प्रदेश सचिव राहुल भैय्या लोणीकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणात यश संपादन करणार असल्याचा विश्वास बोलून दाखवला.

7
36 views