logo

नवी मुंबई राजकारणातील, बदल की चेहरे तेच राहणार?”......


🗞️ राजकीय घराण्यांची चलबिचल सुरू — आरक्षण निघालं की घराण्याचं भविष्य ठरणार!

नवी मुंबई | प्रतिनिधी

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया सुरू होताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
सोडत निघाल्यानंतर कोणत्या प्रभागात कोणाचं आरक्षण ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, पण आता चर्चा आरक्षणावर नाही — तर घराण्यांवर केंद्रित झाली आहे.

सोडत निघताच नागरिकांच्या तोंडी एकच प्रश्न —

> “आता बायको उभी राहणार का? की मुलगी, सून, सासू, जावई... की दुसऱ्या बायकोचा मुलगा?”



राजकारण की घरगुती सोहळा — हेच नागरिकांना समजेनासं झालंय.

SC, OBC, महिला, खुलं अशा आरक्षणांच्या चौकटीत
‘घरातलं नाव कुठं बसतंय’ हे पाहूनच उमेदवार ठरवले जात आहेत, अशी जोरदार चर्चा गल्लीबोळात रंगली आहे.

स्थानिक नेतेमंडळींच्या गणितांना उधाण आलं असून,

> “आरक्षण मिळालं की नाव ठरवू, नाही मिळालं तर दुसरं घर चालवू,”
अशी टोमणेबाजी मतदार करताना ऐकू येत आहे.



नवी मुंबईकरांच्या म्हणण्यानुसार —
“राजकारणाचा रंग बदलतो, पण चेहरे मात्र तेच राहतात.”

या आरक्षण सोडतीतून खरा बदल घडतो का, की पुन्हा ‘राजकीय सोडत’च लागते, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

7
335 views