अपहरण करून बालविवाह केल्याच्या गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता
अहिल्यानगर प्रतिनिधी - कोतवाली पो स्टे गुन्हा र नं 776/2022 आय पी सी कलम 363, 366 पोस्को ऍक्ट 2012 मे कलम 11, 12 व बालविवाह प्रतिबंधक कायदा कलम 9 अन्वे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला. सदर गुन्ह्याचे चार्जशीट अहमदनगर मे सेशन कोर्टात दाखल झाले. सदर केस मध्ये सरकारी पक्षाच्या साक्षीदाराच्या कथनातील विसंगती आरोपी यांच्या वकिलांनी मे. कोर्टाच्या निदर्शनास आणून दिला. सदर केस खोटी आहे असा युक्तिवाद आरोपी यांच्या वकिलांनी केला. सदर केस मध्ये आरोपी याची मे. कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. आरोपी यांच्या वतीने ॲड प्रवीण पालवे व सचिन जाधव यांनी कामकाज पाहिले. त्यांना ॲड नंदिनी कुशवाह यांनी सहाय्य केले.